Arvind Kejariwal Big News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना मोठा धक्का; ईडीची नोटीस; काय आहे प्रकरण...?

ED Inquiry News : ईडीने दिल्लीतील कथित मद्य विक्री धोरण घोटाळा प्रकरणात धडक कारवाई केली होती...
Arvind Kejariwal
Arvind Kejariwal Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी आप नेत्यांचा पाठीमागचा चौकशीचा ससेमिरा संपायची चिन्हे नाहीत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आप खासदार संजय सिंह यांच्या अटकेनंतर ईडीने आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. यात केजरीवालांना 2 नोव्हेंबरला ईडीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

ईडीने दिल्लीतील कथित मद्य विक्री धोरण घोटाळा प्रकरणात धडक कारवाई केली आहे. यापूर्वी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना दिल्लीतीन नवीन दारू विक्री धोरण प्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनिष सिसोदिया यांना देखील फेबुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. ते सध्या कोठडीत आहेत.

Arvind Kejariwal
Maratha Reservation : ''मनोज जरांगेंच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास...'' ; नगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंचा इशारा

दिल्ली सरकारच्या अबकारी धोरण गैरव्यवहार प्रकरणातील कथित सहभागाबद्दल न्यायालयीन कोठडीत असलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया(Manish Sisodia) यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया फेब्रुवारी महिन्यापासून पोलीस कोठडीत आहेत. त्यांची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे

आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejariwal) यांनी ईडीने मद्य घोटाळा प्रकरणी नोटीस पाठवली आहे.मात्र,यापूर्वीही ईडीने केजरीवालांना चौकशीसाठी नोटीस पाठवली होती.मात्र, केजरीवाल ईडीसमोर उपस्थित राहिले नाही.महत्वाची बाब म्हणजे सोमवारीच माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता.दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया फेब्रुवारी महिन्यापासून पोलीस कोठडीत आहेत. त्यांची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे.

कोरोना महामारीच्या काळात मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांवरील दंड माफ करून, त्यांना दिलासा देण्यात आल्याचा आरोपही या अहवालात करण्यात आला होता. या गैरव्यवहारातून जे पैसे मिळाले, ते गोवा आणि पंजाब राज्यात २०२२ साली झालेल्या निवडणुकीत वापरण्यात आल्याचाही आरोप ठेवण्यात आला होता. हा अहवाल सीबीआयने तपासल्यानंतर सिसोदिया यांना अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण...?

मनीष सिसोदिया यांनी उत्पादन शुल्कमंत्री या नात्याने आपल्या मनमानी पद्धतीने आणि एकतर्फी निर्णय घेतल्याचा ईडीचा आरोप आहे. त्यात राज्याच्या तिजोरीचे ५८० कोटींपेक्षा अधिक महसुलाचे नुकसान झाल्याचेही ईडीने म्हटलं आहे.

Arvind Kejariwal
Maratha Reservation:...अन्यथा जिवंत समाधी घेणार; शेतकरी नेते विनायकराव पाटलांचा सरकारला इशारा

‘आप’चे दिल्ली सरकार आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना मद्य व्यवसायातील मालक व दुकानदार यांच्याकडून ‘किकबॅक’ आणि ‘कमिशन’च्या बदल्यात पैसे मिळाले.या कमिशनच्या बदल्यात मद्यविक्री परवानाधारकांना अनुचित लाभ देण्यात आला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com