Bihar Assembly Election Sarkarnama
देश

Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच आयोगाकडून मोठी अपडेट; तब्बल 51 लाख मतदारांची नावं वगळली

Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभेची मुदत 22 नोव्हेंबर 2025 ला संपत आहे. त्याआधी निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सध्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News: बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल या वर्षाअखेरीस वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासह (राजद) सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, दुसरीकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commssion) मोठी अपडेट समोर आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानं एसआयआरद्वारे बिहारमधील तब्बल 51 लाख मतदारांची नावं मतदारयादीतून हटवल्याची माहिती दिली आहे. यात 18 लाख नावं मृत मतदारांची नावं असून 26 लाख मतदार राज्याबाहेर किंवा इतर मतदारसंघात स्थलांतरित झाले आहे.

बिहारबाबत निवडणूक आयोगानं आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती देताना तब्बल 7 लाख मतदारांनी त्यांची नावं दोन ठिकाणी मतदानासाठी नोंदवल्याचं समोर आल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे तेही सर्व नावं मतदारयादीतून वगळण्यात आल्याचं आयोगानं जाहीर केलं आहे. यामुळे आत्तापर्यंत एकूण 51 लाख मतदारांच्या नावांना बिहार राज्याच्या निवडणुकीच्या मतदारयादीतून कात्री लावण्यात आली आहे.

याचदरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगानं एसआयआरवेळी आधार, रेशन कार्ड, जुनं मतदान कार्ड ही कागदपत्रे स्वीकारणार असल्याचे नमूद केलं होतं. पण त्यासह खात्रीशीर आणखी काही कागदपत्र देण्यात यावं अशाही सूचना मतदारांना केल्या आहेत.

मात्र, मतदारांकडून सादर करण्यात आलेल्या संबंधित कागदपत्रांना ग्राह्य किंवा नाकारण्याचा पूर्ण अधिकार हा स्थानिक मतदारनोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदारनोंदणी अधिकारी यांना असणार असल्याचंही आयोगानं स्पष्ट केलं आहे.

देशात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Assembly Election) जोरदार चर्चा सुरू आहे. त्याअनुषंगाने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी एनडीएसह इंडिया आघाडीकडून जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनही तयारी सुरू करण्यात आली आहे.

बिहारची निवडणूक ऑक्टोबर महिन्यातच जाहीर होण्याची शक्यता आहे.कारण निवडणुकीसाठी किमान 45 दिवसांचा कालावधी गृहित धरण्यात आला तर दिवाळीआधीच ही प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. दिवाळी आणि छठ पुजेच्या कालावधीत मतदान घेता येणार नाही.

बिहारमध्ये एक किंवा दोन टप्प्यांत निवडणूक घेण्याबाबत आयोगाकडून विचार केला जाऊ शकतो. ही निवडणूक दिवाळी आणि छठ पूजेनंतर झाल्यास मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. बिहार विधानसभेची मुदत 22 नोव्हेंबर 2025 ला संपत आहे. त्याआधी निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT