पुणे हादरलं! क्लास वन महिला अधिकाऱ्याचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट, पतीनेच घरात लावले स्पाय कॅमेरे

Pune Crime News : या व्हिडिओंच्या आधारे पत्नीला ब्लॅकमेल करत माहेरून पैसे आणण्यासाठी मानसिक छळ केला. आता या प्रकरणी पोलीसांत पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News
Pune Crime Newssarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमीचा सारांश :

  1. पुण्यात एका धक्कादायक घटनेत, एका क्लास 1 अधिकारी महिलेने आपल्या पतीसह सासरच्या सात जणांविरोधात छळाची आणि ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली आहे.

  2. या प्रकरणात पतीनेच पत्नीला ब्लॅकमेल करण्यासाठी तिच्या अंघोळ करतानाचे व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड केले असून, त्यासाठी घरात स्पाय कॅमेरे लावल्याचे समोर आले आहे.

  3. या मानसिक छळामुळे आणि खासगी आयुष्यातील या गंभीर हस्तक्षेपामुळे पीडित महिलेला मोठा धक्का बसला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Pune News : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका क्लास 1 अधिकारी असलेल्या महिलेचा छळ करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी पोलीसांत पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर धक्कादायक म्हणजे पतीनेच आपल्या पत्नीला ब्लॅकमेल करण्यासाठी तिचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट केले आहेत. त्यासाठी घरात स्पाय कॅमेरे लावल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे पुणे हादरले असून जिल्ह्यासह राज्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. (Pune police file FIR against husband due to installed spy cameras to record wife's private moments)

समोर आलेल्या माहितीनुसार, पतीकडून पत्नीवर चारित्र्याविषयी संशय घेत वारंवार शिवीगाळ, अपमान आणि मारहाण केली जात होती. याशिवाय, पतीने घरात गुप्तपणे स्पाय कॅमेरे लावून तिच्या अंघोळीचे आणि इतर खाजगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने दीड लाख रुपये आणि कारच्या हप्त्यासाठी पैसे माहेरून आणण्याची सक्ती केली.

Pune Crime News
Pune Crime News : पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग; धक्का देत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप

या प्रकरणी पतीसह सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश असलेल्या सात जणांविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, तांत्रिक पुरावे, व्हिडिओ फुटेज आणि इतर बाबींची चौकशी केली जात आहे.

30 वर्षीय पीडित महिला देखील सरकारी सेवेत क्लास 1 अधिकारी आहे. तिचे लग्न 2020 साली झाले असून, त्यानंतरपासूनच तिला सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता, असे तिने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Pune Crime News
Pune Crime News: पुण्यातील सदाशिव पेठेत मोठी दुर्घटना; मद्यधुंद कारचालकानं 13 जणांना उडवलं

तसेच आपल्या पतीनेच खाजगी आयुष्यात गंभीर हस्तक्षेप करत गुप्तपणे स्पाय कॅमेरे बसवून तिचे अंघोळीचे आणि इतर खाजगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. या व्हिडिओंच्या आधारे त्याने आपल्याला ब्लॅकमेल करत मानसिक छळ केला. माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com