Chandrapur Bank: उद्धव ठाकरेंना धक्का दिलेल्या रवींद्र शिंदेंनी भाजपवरचा 'तो' ठपका पुसला अन् नवा इतिहासही घडवला

Uddhav Thackeray Vs BJP : संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने अध्यक्ष आमचाच होईल असा दावा केला होता. मात्र, त्यांना शेवटपर्यंत बहुमतासाठी जुळवाजुळव करता आली नाही.
Chandrapur District Bank .jpg
Chandrapur District Bank .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही दावा केल्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस विधिमंडळपक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार सुभाष धोटे यासाठी एकत्र आले होते. यानंतरही त्यांना बँकेवर आपला अध्यक्ष बसवता आला नाही.

भाजप महायुतीने आघाडीचे सर्व मनसुबे उधळून लावले. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि महाविकास आघाडीतून संचालक म्हणून निवडून आलेले रवींद्र शिंदे यांच्या गळात अध्यक्षपदाची माळ पडली. ते दोन आठवड्यांपूर्वीच भाजपात सहभागी झाले होते.

चंद्रपूर जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर 21 संचालकांसाठी चंद्रपूर जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर 13 सदस्य बिनविरोध निवडून आले होते. फक्त 8 सदस्यांसाठी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने अध्यक्ष आमचाच होईल असा दावा केला होता. मात्र, त्यांना शेवटपर्यंत बहुमतासाठी जुळवाजुळव करता आली नाही.

याउलट भाजपने (BJP) संचालक मंडळाच्या निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतरही जोरदार फिल्डिंग लावली होती. महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद आणि भांडणाचाही अचूक फायदा घेतला. रवींद्र शिंदे यांनाचा आपल्या गळला लावले. त्यानंतर आघाडीचे अवसान गळाले.

Chandrapur District Bank .jpg
Sushma Andhare: सुषमा अंधारेंचा सर्वात मोठा दावा; म्हणाल्या,'फडणवीसांपेक्षा अजितदादा मुख्यमंत्री...'

महायुतीतर्फे रवींद्र शिंदे आणि संजय डोंगरे यांनी अनुक्रम अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली होती. भाजपने यासाठी आधीच जुळवाजुळव केली होती. दोघांनाही 21 पैकी 16 ते 17 मते पडली.

दरम्यान, मागील कार्यकाळात चंद्रपूर बँकेतील नोकर भरती घोटाळा चांगलाच गाजला होता. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने एसआयटी लावली होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी एसआयटीने जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या.

Chandrapur District Bank .jpg
Rohit Pawar News: कोर्टात खेचण्याच्या इशाऱ्यानंतरही रोहित पवारांनी कोकाटेंना सोडलंच नाही; म्हणाले,जाहिरात स्कीप करायला 42 सेकंद..?

भाजपचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस महासंचालकांची भेट घेतली. या प्रकरणाचा सीआयडीमार्फत तपास करण्याची मागणी त्यांनी केली होती. संचालक मंडळाच्या निवडणुकीपूर्वी उत्साही असलेले विजय वडेट्टीवार, भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आधीच माघार घेतली होती.

खासदार प्रतिभा धानोरकर या बिनविरोध निवडून आल्या होत्या. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा बँकेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच भाजपचा बँकेचा अध्यक्ष झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com