Nadda Vs Kharge Sarkarnama
देश

Election Commission Notice : ...म्हणून निवडणूक आयोगाने भाजप अन् काँग्रेस अध्यक्षांना पाठवली नोटीस !

Election Commission notice to BJP and Congress leaders: दोन्ही पक्षांना पत्र पाठवून मागवले आहे उत्तर, जाणून घ्या नेमकं काय आहे कारण?

Mayur Ratnaparkhe

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजप आणि काँग्रेस यांनी एकमेकांच्या विरोधात केलेल्या तक्रार प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाकडून भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवून, तक्रारीबाबत उत्तर देण्याच्या दोघांना आयोगाच्या सूचना करण्यात आली आहे.

विरोधातील तक्रारींच्या प्रती दोन्ही पक्षांना आयोगाने पाठवल्या आहेत. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक दरम्यान दोन्ही पक्षांनी आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. सध्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

दोन्ही राज्यात या राजकीय पक्षाचे नेते विरोधकांवर टोकाची टीका करताना दिसत आहेत. अशावेळी काही आक्षेपार्ह वक्तव्यंही केली जात आहेत. याचवरून दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. यावर निवडणूक आयोगाने आता दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना नोटीस बजावून उत्तर मागवले आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission) दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना 18 नोव्हेंबरपर्यंत दुपारी एक वाजेपर्यंत उत्तर देण्यात सांगितले आहे. याचबरोबर त्यांना लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत 22 मे 2024 रोजी जारी केल्या गेलेल्या निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्यास सांगितले आहे. यामध्ये स्टार प्रचारक आणि नेत्यांवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले गेले होते. जेणेकरून निवडणूक प्रचार कालावधीत आदर्श आचारसंहितेचे पालन होईल.

याशिवाय काही दिवसांपूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक प्रचारादरम्यान महिलांविरोधात राजकीय नेत्यांकडून होणाऱ्या अपमानस्पद वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत, याची निंदाही केली होती. एवढंच नाहीतर राजीव कुमार यांनी अधिकाऱ्यांना अशा वक्तव्यांविरोधात त्याचवेळी कडक कारवाई करण्याचेही स्पष्ट निर्देश दिले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT