देश

Macron viral video : फ्रान्सच्या राष्ट्रपतींना पत्नीने मारले थोबाडीत; विमानातून उतरतानाचा नकोसा प्रसंग कॅमेरात कैद

Public and Media Reactions to the Viral Video : विमानातून उतरण्याआधी पत्नीने मॅक्रॉन यांच्या थोबाडीत मारल्याचा व्हिडीओ सध्य व्हायरल झाला आहे.

Rajanand More

घरात कोणत्या ना कोणत्या कारणावरून पती-पत्नीतमध्ये वाद होतच असतात. पण हीच भांडणं चव्हाट्यावर आली तर त्याची गावभर चर्चा होते. अशाच एका भांडणाची चर्चा सध्या जगभरात सुरू आहे. हे जोडपं साधंसुधं नाही. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युल मेक्रॉन आणि त्यांच्या पत्नीतील हे भांडण आहे. या दोघांच्या एका व्हिडीओमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

विमानातून उतरण्याआधी पत्नीने मॅक्रॉन यांच्या थोबाडीत मारल्याचा व्हिडीओ सध्य व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हिएतनामची राजधानी हनोई येथील विमानतळावरील आहे. मॅक्रॉन हे पत्नी ब्रिगिट यांच्यासह व्हिएतनामच्या दौऱ्यावर होते. यादरम्यानच हा प्रकार घडला आहे. विमानाचा दरवाजा उघडल्यानंतर समोरच कुणीतरी मॅक्रान यांचे तोंडाला हाताने धक्का देते.

विमानाचा दरवाजा उघडल्याचे दिसताच मॅक्रान सतर्क होतात आणि विमानाबाहेरील कॅमेराच्या दिशेने हसून हात हलवतात. त्यानंतर पुन्हा आत जातात आणि थोड्यावेळाने पत्नीसह बाहेर येतात. मॅकॉन यांच्या थोबाडीत मारल्याचा हात त्यांच्या पत्नीचाच असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फ्रान्सच्या राष्ट्रपती भवनातून तो एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हा व्हिडीओ खरा असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

राष्ट्रपती मॅकॉन यांच्या निकटवर्तीयाने हा पती-पत्नीतील एक शुल्लक वाद असल्याचे म्हटले आहे. दोघांमधील वादाची दृश्ये कॅमेरात कैद झाल्यानंतर विमानातून उतरतानाही तणाव जाणवला. एकमेकांचा हात हातात न घेता दोघेही विमानातून खाली उतरले. त्यानंतरही त्यांच्या स्वागतासाठी आलेल्यांना भेटताना त्यांच्या वागण्या-बोलण्यातही खुलेपणा दिसला नाही.

लग्नाचा किस्सा प्रसिध्द

राष्ट्रपती मॅक्रॉन आणि पत्नी ब्रिगिट यांच्या विवाहाचा किस्साही प्रसिध्द आहे. दोघांच्या वयामध्ये तब्बल 24 वर्षांचे अंतर आहे. मॅक्रॉन हे पत्नीपेक्षा 24 वर्षांनी लहान आहेत. विशेष म्हणजे ब्रिगिट या शाळेमध्ये मॅक्रॉन यांच्या शिक्षिका होत्या. ते 15 वर्षांचे असतानाच ब्रिगिट यांच्यासोबतची लव्हस्टोरी सुरू झाली होती. त्यावेळी ब्रिगिट यांचे वय 39 वर्षे होते. त्यांचे लग्नही झाले होते आणि त्यांनी तीन मुलंही होती.

मॅक्रॉन यांनी 16 व्या वर्षीच ब्रिगिट यांना लग्नाची मागणी घातली होती. पण त्यांच्या कुटुंबातून आणि समाजातूनही प्रचंड विरोध झाला. त्यानंतर दोघांची लव्हस्टोरी पुढे सुरूच होती. ब्रिगिट यांनी नंतर पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला आणि 2007 मध्ये मॅक्रॉन यांच्यासोबत विवाह केला. त्यावेळी मॅक्रॉन हे 29 वर्षांचे तर ब्रिगिट 54 वर्षांच्या होत्या. 2017 मध्ये मॅक्रॉन फ्रान्सचे राष्ट्रपती बनले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT