ED chief SK Mishra  sarkarnama
देश

ED प्रमुखांना मोदी सरकारकडून तिसऱ्यांदा मोठं गिफ्ट

ED chief SK Mishra : ६० वर्षीय मिश्रा हे १९८४च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत.

सरकारनामा ब्युरो

ED : केंद्र सरकार (central government) सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीसारख्या (ED) केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Mechanisms) गैरवापर करून बिगरभाजपशासित राज्यामधील मंत्र्यांवर बेकायदा कारवाई करीत असल्याच्या आरोप होत असताना मोदी सरकारनं ईडीच्या (Enforcement Directorate) प्रमुखांना मोठं गिफ्ट दिले आहे. (ED chief SK Mishra latest news)

ईडीचे प्रमुख एसके मिश्रा (SK Mishra) यांचा कार्यकाल मोदी सरकारने आणखी एक वर्षासाठी वाढवला आहे. संजय कुमार मिश्रा यांना सेवाकार्यकाळात ही तिसरी मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे या पदावर त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळणारे मिश्रा हे ईडीचे पहिले अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यकाळ पुढच्या आठवड्यात संपणार होता. ६० वर्षीय मिश्रा हे १९८४च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत.

संजय कुमार मिश्रा १९८४च्या भारतीय महसूल सेवा तुकडीतील अधिकारी असून १९ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांच्याकडे ईडीचे प्रमुख संचालक म्हणून पदभार सोपवण्यात आला होता. मिश्रा यांच्या अगोदर आयपीएस अधिकारी कर्नाल सिंग हे ईडीचे प्रमुख होते. त्यावेळी मिश्रा प्राप्तीकर खात्याचे आयुक्त होते.

मिश्रा यांनी ईडीचे प्रमुखपद स्वीकारल्यानंतर अनेक विरोधी पक्ष नेत्यांच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरू झाली. या चौकशा राजकीय हेतूने प्रेरित होत्या असे आरोप त्यावेळी सरकारवर होत होते. त्यात मिश्रा यांना एक वर्षांची मुदतवाढ दिल्याने मोदी सरकारच्या निर्णयावर टीकेची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या काही वर्षांत सीबीआय, प्राप्तीकर खाते यांच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबाव आणला जात होता, त्यात ईडीची भर पडली होती. सीबीआयसारखे ईडीचे तपासही प्रश्न उपस्थित करणारे होते.

केंद्राच्या निर्देशानुसार राजकीय सूडबुद्धीने ईडी काम करत असल्याचे शेकडो आरोप आजपर्यंत विरोधी पक्षांनी केले आहेत. ईडी ही स्वायत्त संस्था असून तिने भाजपच्या नेत्यांवरही कारवाई करणेही आवश्यक आहे पण ईडी त्याबद्दल काहीच कारवाई करत नाही, असेही विरोधकांचे म्हणणे आहे. स्वतःला प्रसिद्धीच्या झोतापासून दूर ठेवणारे अधिकारी म्हणून मिश्रा यांची ओळख आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT