Shivrajsingh Chouhan Government Cabinet Expansion :  Sarkarnama
देश

Madhya Pradesh Cabinet Expansion : निवडणुकीपूर्वीच शिवराजसिंह चौहान मंत्रिमंडळाचा विस्तार; तीन मंत्र्यांनी घेतली शपथ!

सरकारनामा ब्यूरो

Bhopal News : विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी आज शनिवारी (दि.२६ ऑगस्ट) सकाळी मध्यप्रदेशमधील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान मंत्रिमंडळात तीन नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. राजभवनात राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी तिघांनाही आज सकाळी शपथ दिली.

नवीन मंत्र्यांमध्ये महाकौशलमधून गौरीशंकर बिसेन, विंध्यमधून राजेंद्र शुक्ला आणि बुंदेलखंडमधील राहुल लोधी यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. शिवराज मंत्रिमंडळात आता ३३ मंत्री असून अजून एक पद रिक्त आहे. (Latest Marathi News)

सीएम शिवराजसिंह चौहान शुक्रवारी रात्री उशिरा राजभवनात पोहोचले आणि मंत्रिमंडळ विस्तारासाठी राज्यपाल मंगूभाई पटेल यांची भेट घेतली. सुमारे दहा मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. याआधी शुक्रवारी सायंकाळी जबलपूरमध्ये मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले की, रात्री ८ वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची चर्चा आहे, कोण शपथ घेत आहेत? यावर त्यांनी हसत उत्तर दिले होते.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कमलनाथ म्हणाले, "हे मंत्रिमंडळ नाही, तर भ्रष्टाचाराच्या मैत्रीचा विस्तार आहे." त्यांनी ट्विट केले की, 'जेव्हा कार्यकाळ संपत आहे आणि सरकार पडणार आहे, तेव्हा मध्य प्रदेशात मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. निरोपाच्या वेळी स्वागतगीते म्हणणाऱ्या भाजप सरकारला आता विस्तारच, संपूर्ण मंत्रिमंडळ बदलले तरी पराभव निश्चित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT