Jay Shah Sarkarnama
देश

Jay Shah News : मी जय शाह बोलतोय..! मंत्रिपदासाठी 3 आमदारांना फोन, पक्षासाठी केली पैशांची मागणी

Crime News Amit Shah son fake call case : जय शाह यांच्या नावाने आमदारांकडे पैशांची मागणी करणाऱ्या दोघांना उत्तराखंड पोलिसांनी अटक केली आहे.  

Rajanand More

New Delhi News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांच्या नावाने तीन आमदारांना पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही टोळी तिघांची असून आमदारांना मंत्रिपदाचे अमिष दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रियाशू पंत आणि उवेश अहमद असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एकाचा पोलिस शोध घेत आहेत. पंत या दिल्लीत सोमवारी अटक करण्यात आली आहे. तर अहमदला उत्तराखंडमधील रुद्रपूर भागात ताब्यात घेण्यात आले. तिसरा आरोपी फरार असल्याची माहिती हरिद्वारचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक प्रमोद सिंह डोबाल यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हरिद्वारमधील भाजपचे आमदार आदेश चौहान यांच्या पाच लाखांची मागणी केली होती. त्याचप्रमाणे त्यांनी नैनीतालच्या आमदार सरिता आर्या आणि रुद्रपूरचे आमदार शिव अरोरा यांच्याकडूनही पैशांची मागणी केली होती. त्यांना मंत्रिपदाचे अमिष दाखवले होते.

अरोरा यांना फोन करून तीन कोटींची मागणी करण्यात आली होती. मागील आठवड्यात त्यांना एक फोन आला. आपण जय शाह बोलत असून उत्तराखंड सरकारमध्ये काही मंत्री बदलणार आहेत. पक्षनिधीसाठी तीन कोटी रुपये दिल्यास मंत्रिपद मिळेल, असे आरोपींनी म्हटले होते. अरोरा यांनी थेट अमित शाह किंव जे. पी. नड्डा यांची चर्चा करू, असे म्हटल्यानंतर आरोपीने ते खूप व्यस्त असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अरोरा यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

आमदार चौहान यांना रविवारी एक अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. आपण जय शाह असल्याचे समोरून सांगण्यात आले. पक्षनिधीसाठी संबंधित व्यक्तीने चौहान यांच्याकडे पाच लाखांची मागणी केली होती. चौहान यांनी याबाबत शंका आल्याने प्रतिप्रश्न करताच आरोपीने त्यांची सोशल मीडियात बदनामी करण्याची धमकी दिली होती.

चौहान यांनी यानंतर तातडीने पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला. डोबाल यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी मोबाईल फोनचा सीडीआर आयएमईआय क्रमांक आणि लोकेशन तपासले. त्याआधारे दिल्ली आणि गाझियाबादमध्ये काही ठिकाणी रेड टाकण्यात आली. त्यामध्ये पंतला दिल्ली मोबाईलसह अटक करण्यात आली.

पंतकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आमदारांकडून पैसे उकळण्याचा तिघांचा प्लॅन होता. या पैशांतून मौजमजा करण्यासाठी त्यांनी हा प्लॅन बनवला होता, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT