Former Jammu and Kashmir Chief Minister Farooq Abdullah narrowly escaped a firing attack in Jammu’s Greater Kailash area, where police later arrested the accused and launched an investigation. Sarkarnama
देश

Farooq Abdullah Attack : "मागील 20 वर्षांपासून हत्येचा प्रयत्न अन् माझा अजेंडा..."; फारूक अब्दुलांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा खळबळजनक खुलासा

Accused Kamal Singh Jamwal arrest: आरोपी कमल सिंह याचा जन्म 1963 साली झाला असून त्याची जम्मूच्या ओल्ड सिटी भागात त्याच्या काही दुकाने आहेत. या दुकानांमधून येणाऱ्या भाड्यावर तो आपला उदरनिर्वाह करत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

Jagdish Patil

Attacker confession in Farooq Abdullah firing: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जम्मूमधील ग्रेटर कैलाश परिसरात एका लग्न संमारंभातून ते माघारी जात असताना ही घटना घडली.

सुदैवाने या हल्ल्यातून फारुक अब्दुल्ला थोडक्यात बचावले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. कमल सिंह जामवाल (Kamal Singh Jamwal) असं या हल्लेखोराचं नाव असून पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली दिली आहे.

'मी मागील 20 वर्षांपासून डॉ. फारूक अब्दुल्ला यांची हत्या करण्याचा विचार करत होतो', अशी खळबळजनक कबुली या आरोपीने दिली आहे. फारूक अब्दुल्ला यांच्यावर हल्ला करणारा कमल सिंह जामवाल जम्मूतील पुरानी मंडी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी कमल सिंह याचा जन्म 1963 साली झाला असून त्याची जम्मूच्या ओल्ड सिटी भागात त्याच्या काही दुकाने आहेत. या दुकानांमधून येणाऱ्या भाड्यावर तो आपला उदरनिर्वाह करत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाला हल्लेखोर?

पोलिसांनी चौकशी केली असता कमल सिंह म्हणाला की, "मी मागील 20 वर्षांपासून फारूक अब्दुल्ला यांना मारण्याचा प्रयत्न करत होतो. हा माझा वैयक्तिक अजेंडा होता," असं त्याने सांगितलं. तर गोळीबारासाठी वापरण्यात आलेली रिव्हॉल्वर आरोपीचीच असल्याचंही तपासात समोर आलं आहे.

दरम्यान, आता पोलिसांनी आरोपीकडून बंदूक जप्त केली असून या हल्ल्यामागे नेमकं कारण काय आहे आणि या हल्ल्याचं आणखी काही मोठं कनेक्शन समोर येतंय का? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT