VBA leader Prakash Ambedkar addressing media while criticizing Prime Minister Narendra Modi and announcing a protest march in Nagpur on March 23.
VBA leader Prakash Ambedkar addressing media while criticizing Prime Minister Narendra Modi and announcing a protest march in Nagpur on March 23.Sarkarnama

Prakash Ambedkar: RSSच्या कार्यालयावर मोर्चाची प्रकाश आंबेडकरांकडून तयारी सुरु; म्हणाले, कोणीही यावं अन् मोदींना...

VBA Protest Nagpur March 23 : गॅस तुटवडा आणि परराष्ट्र धोरणावरून प्रकाश आंबेडकरांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका करत 23 मार्च रोजी नागपूरमध्ये मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे.
Published on

Pune News : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, सरकारच्या आताच्या धोरणांमुळे भारतीय नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. इराण आपल्या बरोबर जम्मू आणि काश्मीर प्रश्नावर उभा राहिला होता. परंतू इराणवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा आपण त्यांच्या बाजूने नाही अस स्पष्ट केलं आहे.

चीन हा इराणचा मित्र असून त्याला तेल पोहोचेल याची पूर्ण जबाबदारी इराणने घेतली आहे. इराणप्रमाणे आपण देखील जर मित्रता निभावली असती तर भारताला इराणने गॅस आता देखील पुरवला असता आणि आज गॅसचा जो तुटवडा आहे तो आपल्याला जाणवला नसता.

या तुटवड्यामुळे सरकारने आता जीवनावश्यक वस्तूंचा कायदा लागू केला आहे. तसेच आंदोलन करता येणार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे धोरण नाही. ते केवळ जात आणि धर्म एवढाच यांचा अजेंडा चालवत आहेत. हे लोक आंतरराष्ट्रीय राजकारण करू शकत नाहीत हे सिद्ध होत आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

VBA leader Prakash Ambedkar addressing media while criticizing Prime Minister Narendra Modi and announcing a protest march in Nagpur on March 23.
Shivsena On Modi Government: बांग्लादेशला डिझेल पुरवठा, उद्धव ठाकरेंचा नेता मोदी सरकारवर प्रचंड भडकला; म्हणाला,'हा कोणता शेजारधर्म?'

आता गॅसचा तुटवडा झाला आहे. आगामी काळात बँकिंगमधून पैसा काढता येणार नाही. असं झाल्यास सामान्य माणसाचा पैसा बँकेतच राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एप्स्टिन फाईलमध्ये आलं आहे. त्यामुळे मराठीतील म्हणीप्रमाणे कुणीही यावं आणि टपली मारून अशी जावं अशी अवस्था पंतप्रधानांची झाली असून नरेंद्र मोदी मुकाटपणे सगळ्या फाईलवर सह्या करत आहेत.

VBA leader Prakash Ambedkar addressing media while criticizing Prime Minister Narendra Modi and announcing a protest march in Nagpur on March 23.
Pune News : PM मोदींना पुरस्कार दिल्यानं काँग्रेसनं नातं तोडलं; पुण्यातील लोकमान्य टिळकांचे वारसदार आता शिवसेनेच्या वाटेवर

ही धोकादायक परिस्थिती आहे. त्यामुळे तमाम भारतीयांना माझं आवाहन आहे.आपण 23 मार्चला नागपूरच्या मोर्चामध्ये सहभागी होऊयात आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना जाब विचारू की, नरेंद्र मोदी हे तुमच्या सांस्कृतिक थिअरीमध्ये बसतात का? आणि बसत नसेल तर त्यांना बाजूला का हटवत नाही? असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com