Budget 2025 Announcement Live Sarkarnama
देश

New Tax Regime 2025 : मध्यमवर्गासाठी मोदींची मोठी भेट; 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न केले करमुक्त

Budget 2025 Announcement Live Updates : आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसामान्याचं लक्ष लागून असलेल्या टॅक्सबद्दल मोठी घोषणा केली. त्यांनी12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त असणार असल्याचं जाहीर केलं.

Jagdish Patil

Budget 2025 Announcement Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील 2025-26 वर्षासाठीचा संपूर्ण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) संसदेत सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करत सीतारामन यांनी सलग आठ अर्थसंकल्प सादर करणाऱ्याचा विक्रम त्यांच्या नावावार नोंदवला.

आजच्या या अर्थसंकल्पात ( Union Budget 2025) त्यांनी सर्वसामान्याचं लक्ष लागून असलेल्या टॅक्सबाबत मोठी घोषणा केली. यावेळी इथून पुढे आता 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असल्याचं त्यांनी जाहीर केलं. यासह आजच्या बजेटमधून त्यांनी शेतकरी, सूक्ष्म व लघू उद्योग यासह विज्ञान आणि तंत्रज्ञानावर भर दिल्याचं पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाचं मानल्या जाणाऱ्या किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा त्यांनी 3 लाखांवरून 5 लाखांवर केली. तर यूरीया निर्मितीत देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी तीन नवीन कारखाने उभारणार असल्याची घोषणा सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केली.

तसंच देशात 3 एआय सेंटर (3 AI Center) उभारण्यात येणार असून लोकांसाठी परदेशी प्रवासासाठी गरजेचा असलेल्या व्हिजासाठीचे नियम सोपे करत तो सहज उपलब्ध व्हावा यासाठी अनेक नियमांत बदल करण्यात आले आहे.

तर पुढील आठवड्यात इन्कम टॅक्स बील पुढील संसदेत मांडलं जाणार आहे. यासह कस्टम ड्युटीतून 36 महत्त्वाची औषधं वगळली जाणार असून कॅन्सरवरील औषधं कस्टम ड्युटीतून वगळण्यात येणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT