Five State Assemby Elections : Sarkarnama
देश

Five State Assemby Elections : निकालाआधीच बंडखोर-अपक्षांवर करडी नजर; घोडेबाजाराला उधाण येणार?

Chetan Zadpe

Delhi News : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले आहेत. यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. 3 डिसेंबर रोजी चार राज्यांच्या विधानसभेचे निकाल हाती येणार आहेत. आता निकालाच्या प्रतीक्षेत असणारे राजकीय पक्ष आपापल्या पक्षातील बंडखोर, अपक्ष आणि प्रबळ मानल्या जाणाऱ्या अन्य छोट्या पक्षांच्या उमेदवारांशी संपर्क साधत आहेत, अतितटीची लढत होऊन सत्तेच्या समीकरणासाठी गरज पडल्यास त्यांना सोबत घेता येईल, अनेक एक्झिट पोलने चारही राज्यांत अटीतटीची लढत होणार असल्याचे संकेत दिले होते. यामुळे सर्वच पक्ष आता सावध भूमिकेत दिसत आहेत. (Latest Marathi News)

पाच राज्यांच्या निवडणुका या लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिले जाते. या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी, लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप आणि काँग्रेससाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही पक्ष कोणत्याही मार्गाने सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे चित्र दिसणार आहे. मतदानानंतरचे बहुतांश एक्झिट पोलचे अंदाजही अटीतटीची लढत असल्याचे सांगितले आहे.

प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यापूर्वीच दोन्ही पक्षांकडून डावपेचांना सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. कमी-जास्त जागा मिळाल्यास, सत्तेचे समीकरण अडल्यास अपक्ष आणि बंडखोरांना सोबत आणता यावे, यासाठी नेते त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. राजस्थानमध्येही 2018 मध्ये काँग्रेसने बंडखोर आणि अपक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते. त्यावेळी काँग्रेसला 100 जागा मिळाल्या होत्या आणि स्पष्ट बहुमतासाठी फक्त एक जागा कमी होती. त्यावेळी त्यांनी 12 बंडखोर आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा घेतला होता.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये चुरशीची स्पर्धा -

मध्य प्रदेशातदेखील 2018 मध्ये काँग्रेसने 114 जागा जिंकल्या होत्या, भाजपच्या 109 जागांपेक्षा काँग्रेसच्या पाच जागा जास्त आल्या होत्या, परंतु स्पष्ट बहुमतासाठी दोन जागा कमी होत्या. यानंतर काँग्रेसने अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने सरकारही स्थापन केले. यावेळीही मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये निकराची लढाई होण्याची शक्यता आहे, अशा स्थितीत दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

तेलंगणात सत्तेचे समीककरण अडू शकते -

तेलंगणाबाबतही अद्यापही परिस्थिती काही निश्चितता स्पष्ट नाही. तेथेही अपक्ष, बंडखोर व अन्य छोटे पक्ष महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. यांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस आणि बीआरएसमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

मिझोरममध्ये झेडपीएम-एमएनएफ यांच्यात चुरशीची लढत -

मिझोरममध्येही हीच परिस्थिती आहे. झेडपीएम आणि एमएनएफ या स्थानिक पक्षांमध्ये चुरशीची लढत आहे. काँग्रेसनेही जोरदार येथे लढत दिली आहे. भाजपचाही इथे राजकीय चंचुप्रवेश होऊ शकतो. अशा परिस्थितीत नव्या सरकारसाठी स्थापन होण्यात काही राजकीय अडचणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT