देश

Online Classes: 'वर्क फ्रॉम होम'नंतर आता विद्यार्थ्यांसाठी 'शाळांचे वर्ग ऑनलाईन' घेण्याचं पंतप्रधानांचं आवाहन

Online Classes: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आणखी काही नव्या गोष्टींचं आवाहन केलं आहे, यामध्ये देशांतर्गत लग्न आणि शाळांचे ऑनलाईन वर्ग घेण्याचं आवाहन केलं आहे.

Amit Ujagare

Online Classes: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आणखी काही नव्या गोष्टींचं आवाहन केलं आहे, यामध्ये देशांतर्गत लग्न आणि शाळांचे ऑनलाईन वर्ग घेण्याचं आवाहन केलं आहे. गुजरातमधील वडोदरा इथं सरदारधाम होस्टेलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी काटकसरीनं गोष्टी वापरण्याचा पुनरुच्चार केला. इराण-अमेरिका युद्ध परिस्थितीमुळं इंधन आणि परदेशी चलन वचावण्यासाठी त्यांनी आवाहन केलं आहे.

वडोदरा इथं बोलताना मोदी म्हणाले, "गेल्या काही वर्षात जग सातत्यानं अस्थिर परिस्थितून जात आहे. आधी कोरोनचं संकट त्यानंतर जागतिक आर्थिक आव्हानं त्यानंतर आता पश्चिम आशियातला वाढता तणाव या सर्वा गोष्टींचा परिणाम सातत्यानं संपूर्ण जगावर होत आहे. त्यातून भारतही सुटलेला नाही. जर कोरोना महामारी या काळातील सर्वात मोठं संकट होतं तर मग पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. जेव्हा आपण कोरोनाशी मिळून लढ दिला आहे आता या संकटातूनही आवश्य बाहेर येऊ. सरकारही सातत्यानं हा प्रयत्न करत आहे की देशातील सामान्य नागरिकाला या सर्व विपरित परिस्थितीचा कमीत कमी परिणाम व्हावा. पण अशा परिस्थितीत देशाला जनतेच्या सहकार्याची गरज आहे. आपल्याला भारताच्या नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्यावं लागेल. यापूर्वीहीच्या दशकांतही जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण व्हायच्या तेव्हा देशातील संसाधनांवर पडणारा ताण कमी करत होता"

मोदी पुढे म्हणाले, तुम्हाला हे चांगलच माहिती आहे की, अनेक उत्पादनांच्या आयातीसाठी भारत लाखो-करोडो रुपयांची विदेशी चलन खर्च करते. सध्या परदेशातून येणाऱ्या वस्तूंच्या किंमतीं गगनाला भिडल्या आहेत. त्याचबरोबर सप्लाय चेनही उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळं देशावर सध्या हे दुहेरी संकट आलं आहे. त्यामुळं अशा उत्पादनांचा उपयोग कमी करायचा आहे जे विदेशातून येतात. तसंच अशा व्यक्तिगत कामांपासूनही वाचायचं आहे, ज्यात परदेशी चलन खर्च होतं.

भारताच्या पोर्टवरील सर्वात मोठा हिस्सा म्हणजे क्रूड ऑईल आहे. दुर्देवानं ज्या क्षेत्रातून आपल्याला सर्वात जास्त प्रमाणात हे क्रूड ऑईल मिळतं त्याच भागात सध्या संघर्ष आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळं जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत आपल्या सर्वांना मिळून छोटे छोटे संकल्प घ्यावे लागतील.

शाळांचे क्लासेस ऑनलाईन करावेत

काल मी कर्नाटक आणि तेलंगणातही याबाबत आवाहन केलं होतं. त्यानंतर मी आता गुजरातमध्येही हा आग्रह करतो आहे की, माझी देशातील प्रत्येक नागरिकाला आवाहन आहे की, जिथं शक्य असेल तिथं पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करावा, मेट्रोचा वापर पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्त वापर करावा, कार पुलिंगचा वापर करा, सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये व्हर्च्युअल मिटिंग आणि वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावं, मी काही शाळांना देखील आवाहन करेन की त्यांनी काही काळासाठी ऑनलाईन क्लासेसवर भर द्यावा. केवळ इंधनच नव्हे तर खाण्याच्या तेलावरही परदेशी चलन खर्च होतो. त्यामुळं खाण्याचं तेलंही कमी वापरलं तर देशाला आणि आपल्या प्रकृतीला दोघांनाही याचा लाभ होईल.

'स्टॅच्यु ऑफ युनिटी'जवळ डेस्टिनेशन वेडिंग करा

जोपर्यंत परिस्थिती सुधरत नाही तोपर्यंत सोने खरेदी टाळा. विदेशी वस्तूंऐवजी स्थानिक उत्पादनांचा वापर करावा. शेतीमध्ये स्वदेशी खते, नैसर्गिक शेती करावी, डिझेल पंपाऐवजी सोलर पंपाचा वापर करावा, सुट्ट्या लागल्या की लोक मुलांना घेऊन परदेशात फिरायला जातात, त्याचबरोबर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्याही येत आहेत, त्यामुळं लोक परेदशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करतात. पण आता तिथं लग्नसोहळे करु नका कारण यातही मोठ्या प्रमाणावर परदेशी चलन खर्च होतं. त्यामुळं तुम्ही आपल्या इथं गुजरातमध्ये 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'जवळ डेस्टिनेशन वेडिंग करा. उलट तुम्ही परदेशात स्थायिक असाल तर कमीत कमी पाच परदेशी नागरिकांना तुम्ही भारत दाखवण्यासाठी घेऊ या. त्यांना कमीत कमी एका भारत ट्रिपसाठी प्रेरित करा. डिस्टेनेशन वेडिंगसाठी 'एकतानगर' हा चांगला पर्याय आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

SCROLL FOR NEXT