West Bengal Election: निवडणुकीनंतर पश्चिम बंगालच्या SIR प्रक्रियेवर शंकांचं काहूर! सुप्रीम कोर्टाकडून ममता बॅनर्जींसह इतर उमेदवारांना नव्यानं अर्ज करण्याचे निर्देश

West Bengal Election: TMCच्यावतीनं बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कल्याण बॅनर्जी यांनी न्यायालयाला सांगितलं की, एका मतदारसंघात एक उमेदवार ८६२ मतांनी पराभूत झाला होता, तर त्याच मतदारसंघात ५,४३२ नावे sir मध्ये वगळण्यात आली होती.
West Bengal SIR, Mamta Banerjee
West Bengal SIR, Mamta Banerjee
Published on
Updated on

West Bengal Election 2026: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या ठिकाणी ममता बॅनर्जी यांचा १५ वर्षांच्या सत्ताकाळानंतर पराभव झाला असून भाजपला इथं 207 जागांसह ऐतिहासिक विजय मिळाला आहे. पण निवडणुकीपूर्वी इथं झालेल्या विशेष मतदार फेरपडताळणी अर्थात SIR कार्यक्रमांतर्गत ९६ लाख मतदारांची नाव वगळण्यात आल्यानं मोठा गदारोळ माजला होता.

पण आता निवडणुकीनंतर जो निकाल समोर आला आहे, त्यावर SIRचा मोठा परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. यापार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टानं पराभूत झालेल्या ममता बॅनर्जी यांच्यासह इतर लोकांना नव्यानं अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. कापलेल्या मतदारांपेक्षा कमी मार्जिननं पराभव झालेल्यांनाच असा अर्ज करता येणार आहे.

West Bengal SIR, Mamta Banerjee
Minister's Convoy: सामान्यांना दिलासा मिळणार? महाराष्ट्रात मंत्र्यांच्या ताफ्यांवर निर्बंधांचे संकेत; मोदींच्या आवाहनाचा परिणाम

सुप्रीम कोर्टानं सोमवारी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसला (TMC) सांगितलं की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ मध्ये विविध मतदारसंघांमध्ये विजयाचे मताधिक्य हे 'SIR' (मतदार यादी पुनरीक्षण) प्रक्रियेअंतर्गत वगळण्यात आलेल्या मतांच्या संख्येपेक्षा कमी होतं, या दाव्याबाबत ते नवीन याचिका दाखल करू शकतात. TMCच्यावतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कल्याण बॅनर्जी यांनी न्यायालयाला सांगितले की, TMC च्या विजयाचे मताधिक्य हे SIR छाननी प्रक्रियेदरम्यान वगळण्यात आलेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा कमी होते. त्यांनी असा आरोप केला की, ३१ जागांवर विजयाचे मताधिक्य हे वगळण्यात आलेल्या मतांच्या संख्येपेक्षा कमी होते.

West Bengal SIR, Mamta Banerjee
Crime News : Instagram वर जडलेल्या प्रेमासाठी तरुणीने ओलांडली सीमा, विनापासपोर्ट भारतात प्रवेश केला अन् कुणकुण लागताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

युक्तीवाद करताना अॅड. कल्याण बॅनर्जी यांनी न्यायालयासमोर एक तक्ता (chart) सादर केला. यामध्ये असे दर्शविले होते की, ३१ जागांवर वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या ही विजयाच्या मताधिक्यापेक्षा जास्त होती. या सादर केलेल्या बाबींना प्रतिसाद देताना, भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी निरीक्षण नोंदवलं की, संबंधित पक्ष कोणतीही अंतरिम याचिका (IA) दाखल करू इच्छित असल्यास, ती दाखल केली जाऊ शकते. न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी बॅनर्जी यांना सांगितले की, SIR छाननी प्रक्रियेअंतर्गत मतदारांना वगळल्यामुळे ज्या निवडणूक निकालांवर कथितरित्या महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे, त्याबाबत कोणतेही म्हणणे मांडण्यासाठी एक स्वतंत्र अंतरिम याचिका (IA) दाखल करणे आवश्यक असेल.

West Bengal SIR, Mamta Banerjee
Minister's Convoy: सामान्यांना दिलासा मिळणार? महाराष्ट्रात मंत्र्यांच्या ताफ्यांवर निर्बंधांचे संकेत; मोदींच्या आवाहनाचा परिणाम

"बंडोपाध्याय, तुम्हाला ज्याविषयी बोलायचे आहे जसे तुम्ही म्हणता की, SIR छाननी प्रक्रियेअंतर्गत मतदारांना वगळल्यामुळे ज्या निवडणूक निकालांवर महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे. त्याबाबतचे म्हणणे मांडण्यासाठी एक स्वतंत्र अंतरिम याचिका दाखल करणे आवश्यक आहे," असे न्यायमूर्ती बागची म्हणाले.

भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील डी. एस. नायडू यांनी युक्तिवाद केला की, "जर पक्षाला निवडणुकांबाबत काही तक्रार किंवा गाऱ्हाणे असेल, तर ते निवडणूक याचिका दाखल करू शकतात. तसंच जर SIR प्रक्रियेमध्ये काही त्रुटी किंवा चुका असतील, तर त्या आपण (न्यायालयाच्या) निदर्शनास आणून देऊ शकता; आम्ही त्यावर नक्कीच उत्तर देऊ"

West Bengal SIR, Mamta Banerjee
Maharashtra ZP elections : 20 जिल्हा परिषदांच्या रखडलेल्या निवडणुकांबाबत आली नवी अपडेट : सुप्रीम कोर्टाने दिला पावसाळ्यातील मुहुर्त

बॅनर्जी यांनी न्यायालयाला अशीही माहिती दिली की, कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश टी.एस. शिवज्ञानम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर सरन्यायाधीशांनी (CJI) टिप्पणी केली, "आम्ही यात काय करू शकतो? आम्ही कोणत्याही न्यायाधीशाला काम करण्यासाठी सक्ती करू शकत नाही."

मागील सुनावणीत काय घडलं?

मागील सुनावणीच्या वेळी, भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी निरीक्षण नोंदवले की,"एक नागरिक म्हणून, मतदानाच्या टक्केवारीचे प्रमाण पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला आहे. तसेच त्यांनी असेही नमूद केलं होतं की, देशातील नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सक्रियपणे सहभागी होणे गरजेचे आहे. सरन्यायाधीशांनी पुढे असंही म्हटलं की, जेव्हा लोकशाहीमध्ये नागरिक आपल्या मताच्या अधिकाराद्वारे स्वतःची ताकद ओळखतात आणि कायद्याचे राज्य (rule of law) पाळतात, तेव्हा ते कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारात सहभागी होत नाहीत. लोकशाहीमध्ये लोकांना आपल्या सत्तेची आपल्या मतदानाच्या शक्तीची जाणीव होते आणि ते कायद्याच्या राज्याचे पालन करतात. तेव्हा ते हिंसाचारात सहभागी होत नाहीत," असे असे सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com