Former Army Chief Manoj Naravane Sarkarnama
देश

Manoj Naravane : चीनचे राष्ट्राध्यक्ष 16 जून कधीच विसरणार नाहीत! नरवणेंनी सांगितली ‘त्या’ चकमकीची कहाणी

Rajanand More

India vs China : दिवस होता, १६ जुन २०२०... ठिकाण, गलवान खोरे... चीनला मागील २० वर्षांत पहिल्यांदाच प्राणघातक चकमकीचा सामना करावा लागला. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी आणि भारतीय लष्करात झालेल्या चकमकीत चीनचे ४० हून अधिक सैन्य मारले गेले... या दिवशी घडलेल्या घडामोडींची कहाणी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आत्मचरित्रात सांगितली आहे. या दिवशी भारताने चीनला जोरदार टक्कर देत धडा शिकवला. त्यामुळे हा दिवस चीन कधीही विसरणार नाही, असे नरवणे यांनी म्हटले आहे.

मनोज नरवणे (Manoj Naravane) यांनी ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ (Four Stars of Destiny) या आत्मचरित्रात त्यांनी या गलवान (Galwan) खोऱ्यातील संघर्षाच्या आठवणी सांगत भाष्य केले आहे. हे आत्मचरित्र जानेवारी महिन्यांत प्रकाशित होणार आहे. नरवणे यांनी लिहिले आहे की, चीनचे राष्ट्रपती १६ जून ही तारीख कधीच विसरणार नाही. शी जिनपिंग (Xi Jinping) यांचा हा जन्मदिवस. हा असा दिवस आहे, जो ते लवकर विसरू शकत नाहीत.

नरवणे हे ३१ जानेवारी २०१९ ते ३० एप्रिल २०२२ या कालावधी लष्करप्रमुख होते. गलवान खोऱ्यातील संघर्ष करिअरमधील सर्वात दु:खद दिवस असल्याचे सांगताना नरवणे यांनी म्हटले आहे की, जून २०२० मध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. आक्रमक कुटनीती आणि उकसवण्याची रणनीती अवलंबत चीन भूतान, नेपाळसारख्या लहान शेजाऱ्यांना घाबरवते. पण भारताने प्रतिकार करत शेजारील देश टक्कर देऊ शकतात हे चीन आणि जगालाही दाखवून दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पूर्व लडाख सीमेवरील वाद मे २०२० मध्ये सुरू झाला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. त्यातून तोडगा निघाल्याचे दिसत असताना चीने माघार घेण्यासही सुरूवात केली होती. आम्ही तंबू हटविण्यास सांगत असताना त्यांची भूमिका बदलत होती. त्यानंतर आम्ही आमचे तंबू उभे करायला सुरूवात केली. हे पाहून चीनच्या सैनिकांनी हल्ला केला, असे नरवणे यांनी पुस्तकात लिहिले आहे.

कर्नल संतोष बाबू यांच्या टीमवर हल्ला झाला. रात्रभर चकमक सुरूच होती. पण त्यामध्ये शस्त्रास्त्रांचा वापर झाला नाही. दगडफेक आणि लाठीचा वापर करण्यात आला होता. दोन्ही बाजूकडील जवानांमध्ये रात्रभर हा संघर्ष सुरू होता. या संघर्षामध्ये २० जवान शहीद झाले. त्यामुळे हा दिवस सर्वात दु:खद दिवस होता, अशी भावना नरवणे यांनी व्यक्त केली.

 (Edited By - Rajanand More) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT