Dawood Ibrahim : दाऊदचा गेम? दोन दिवसांपासून कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू

Dawood Ibrahim Hospitalised in Pakistan Karachi Poisoned : अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्थेत उपचार सुरू...
Dawood Ibrahim
Dawood IbrahimSarkarnama

Dawood Ibrahim Poisoned in Pakistan : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला पाकिस्तानातील कराचीमध्ये एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विषबाधेमुळे त्याच्यावर रुग्णालयात अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्थेत उपचार सुरू असल्याची बातमी पाकिस्तानात वाऱ्यासारखी पसरली आहे.

रुग्णालयातील दाऊदवर उपचार सुरू असलेला संपूर्ण मजला रिकामा करण्यात आला असून, केवळ जवळचे नातेवाईक आणि रुग्णालयाशी संबंधित ठराविक जणांनाच प्रवेश दिला जात असल्याचेही माहिती आहे.

जगातील मोस्ट वाँटेडच्या लिस्टमध्ये टॉपवर असलेला दाऊद (Dawood Ibrahim) नेमका कुठे आहे, याबाबत ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. तो पाकिस्तानात असल्याचा संशय अनेक देशांना आहे. पण पाकिस्तानकडून (Pakistan) हे दावे सातत्याने फेटाळले जातात. आता दाऊदवर कराचीतील रुग्णालयात दोन दिवसांपासून उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे.

Dawood Ibrahim
Giriraj Singh : हलाल मटण सोडा, झटका मटणच खा! केंद्रीय मंत्र्यांचा हिंदूंना सल्ला

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, दाऊदवर मागील दोन दिवसांपासून उपचार सुरू आहेत. जिथे उपचार सुरू आहेत, त्या ठिकाणी अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. याची दखल मुंबई पोलिसांनीही घेतली असून, दाऊदच्या उपचाराबाबतची अधिक माहिती मिळवण्याचा प्रय़त्न केला जात आहे. त्याचे नातेवाईक अलीशाह पारकर आणि साजिद वागळे यांच्याकडे ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांकडून केला जात असल्याचे ‘इंडिया टुडे’ने म्हटले आहे.

दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या मुलाने दाऊद हा कराचीत असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेला जानेवारी महिन्यात सांगितले होते. त्याने दुसरा विवाह केल्याचा दावाही केला होता. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दाऊदचे नातेवाईक किंवा पाकिस्तानातील कोणत्याही यंत्रणेकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही.

(Edited By - Rajanand More)

Dawood Ibrahim
Sanjay Raut: 'कोणावर काय कारवाई करायची हे दिल्लीतून ठरतं'; खासदार राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com