Lok Sabha Security Breach : दिल्ली पोलिसांचा महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये तळ; 50 टीमकडून तपास

Maharashtra : अटक करण्यात आलेला अमोल शिंदे लातूर जिल्ह्यातील
Lok Sabha Security Breach
Lok Sabha Security BreachSarkarnama
Published on
Updated on

Delhi Police : लोकसभेत 13 डिसेंबर रोजी झालेल्या घुसखोरी प्रकरणात तपास यंत्रणांकडून वेगाने चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाची पथके महाराष्ट्रासह राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तळ ठोकून आहेत. आरोपींच्या बँक खात्यापासून महत्त्वाची कागदपत्रे तसेच संबंधित सर्व ठिकाणांची झाडाझडती घेतली जात आहे.

लोकसभेत (Lok Sabha) 13 डिसेंबरला दोघा तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर सुरक्षेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून, सर्वजण पोलिस (Police) कोठडीत आहेत. सर्वांनी मिळून हे षडयंत्र केल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, त्यामागचा त्यांचा नेमका उद्देश, फंडिंग कुठून झाले, नक्षलवादी संबंध आहे किंवा नाही, अशा विविध अंगाने तपास यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. (Parliament Security Breach)

Lok Sabha Security Breach
Sanjay Raut: 'कोणावर काय कारवाई करायची हे दिल्लीतून ठरतं'; खासदार राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) विशेष कक्षाकडून सहा राज्यांमध्ये पथके पाठवण्यात आली आहेत. प्रत्येक आरोपीच्या घरी जाऊन चौकशी केली जात आहे. घटनेशी संबंधित सर्व धागेदोरे तपासले जात आहेत. याव्यतिरिक्त 50 स्वतंत्र टीम करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून डिजिटल पुरावे, बँक व्यवहारांची माहिती आणि आरोपींची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांच्या विशेष पथकाकडून आरोपींनाही सोबत नेण्यात आले आहे. आरोपींना त्यांच्या राज्यात नेऊन तपास केला जात असून, अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवले जात आहे. घुसखोरी कटाचा मास्टरमाइंड असलेल्या ललित झा याला जनकपुरीतील विशेष टीमकडे सोपवण्यात आले आहे. त्याने जाळलेले मोबाईल राजस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहेत.

Lok Sabha Security Breach
Giriraj Singh : हलाल मटण सोडा, झटका मटणच खा! केंद्रीय मंत्र्यांचा हिंदूंना सल्ला

सर्व आरोपींना वेगवेगळ्या विशेष पथकांकडे शनिवारीच सोपवण्यात आले आहे. हा तपास पूर्ण झाल्यानंतर या आरोपींना एकत्र आणून त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे तपास यंत्रणांतील सूत्रांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, या प्रकरणात लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदेलाही अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, सागर शर्मा, मनोरंजन डी, नीलम यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.

(Edited By - Rajanand More)

Lok Sabha Security Breach
Dawood Ibrahim : दाऊदचा गेम? दोन दिवसांपासून कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com