Atishi, Rekha Gupta Sarkarnama
देश

Delhi Assembly : दिल्लीत पुन्हा इतिहास घडला; भाजपनंतर ‘आप’नेही घेतला मोठा निर्णय…

BJP AAP Politics Delhi Ex CM Atishi News Opposition leader : दिल्ली विधानसभेत आता नाराशक्ती दिसणार आहे. माजी मुख्यमंत्री आतिशी या आता विरोधी पक्षनेते असतील.

Rajanand More

Delhi Politics : भाजपने दिल्लीत तब्बल 27 वर्षानंतर सत्ता काबीज करत इतिहास घडवला. त्यानंतर रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रिपदी निवड करत भाजपने सर्वांनाच धक्का दिला. भाजपनंतर आता आम आदमी पक्षाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. दिल्ली विधानसभेत पहिल्यांदाच नारीशक्ती आवाज दणाणणार आहे.

रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. आत आपनेही माजी मुख्यमंत्री आतिशी यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ टाकली आहे. दिल्ली विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला आमदार विरोधी पक्षनेतेपद भुषवणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदाही महिलाच आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा इतिहास घडला आहे.

आतिशी यांना केवळ काही दिवस मुख्यमंत्रिपद मिळाले. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्याने पुन्हा मुख्यमंत्री होता आले नाही. मात्र, त्याचवेळी या निवडणुकीत पक्षाचे अनेक मातब्बर नेते पराभूत झाले. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया, सोमनाथ भारती सत्येंद्र जैन आदी नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आपला केवळ 22 जागांवर समाधान मानावे लागले.

आतिशी या केजरीवालांच्या अत्यंत विश्वासू नेत्या मानल्या जातात. त्यामुळे आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पाच महिन्यांतच त्यांची जबाबदारी बदली आहे. सरकारमध्ये असताना त्यांनी शिक्षण, अर्थ, ऊर्जा यांसह विविध महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.

आतिशी यांच्यासमोर मोठे आव्हान

भाजपला सत्ता मिळाल्यानंतर आपच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे कॅगचा अहवाल सर्वात महत्वाचा ठरणार आहे. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात कॅगचा अहवाल सादर केला जाणार आहे.

त्यावरून भाजप आणि आपमध्ये जोरदार खडाजंगी होऊ शकते. त्याचप्रमाणे कथित मद्य धोरण घोटाळा, पाणी पुरवठा, यमुना स्वच्छता, प्रदुषण असे अनेक मुद्देही अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. त्यावरून आतिशी भाजपवर कसा पलटवार करणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT