Radhika Khera, Shekhar Suman Sarkarnama
देश

Radhika Khera News : काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप करणाऱ्या राधिका खेडांसह शेखर सुमन भाजपमध्ये

BJP Politcs : राधिका खेरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे सांगितले होते. पण काही तासांतच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Rajanand More

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपने अन्य पक्षांतील नेत्यांसह प्रसिध्द व्यक्तींना पक्षात प्रवेश देण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या राधिका खेडा (Radhika Khera News) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच अभिनेते शेखर सुमन यांनी राजकारणात एंट्री करत भाजपला पसंती दिली आहे.

राधिका खेडा या काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय मीडिया समन्वयक होत्या. मात्र, अयोध्येतील राम मंदिरात जाऊ आल्यानंतर पक्षातील नेत्यांकडून सातत्याने अपमानित करण्यात आल्याची टीका करत त्यांनी दोन दिवसांपुर्वी पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर अनेक गंभीर आरोपही त्यांनी पक्षातील नेत्यांवर केले आहेत. तसेच कालच त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Latest Political News)

मंगळवारी खेडा यांच्यासह शेखर सुमन (Shekhar Suman) यांचा भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tavde) यांच्या उपस्थित पक्षप्रवेश झाला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खेडा म्हणाल्या, काँग्रेस पक्ष रामविरोधी असल्याचे मी नेहमी ऐकत होते. पण मीच त्याची साक्षीदार आहे. मी राम मंदिरात गेल्यानंतर मला चांगली वागणूक मिळाली नाही. मला न्याय मिळाला नाही. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राधिका खेडा यांनी कोणते आरोप केले होते?

मला प्रत्येकवेळी अपमानित करण्यात आले. माझ्या चरित्रावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान छत्तीसगडमध्ये पक्षाच्या मीडिया प्रमुखांसह काही जणांनी माझ्या रुमकडे येऊन मला दारू ऑफर केली होती. सचिन पायलट (Sachin Pilot) आणि जयराम रमेश (Jairam Ramesh) यांना याबाबत सांगितले होते, असा दावा खेडा यांनी केला आहे.

पक्षाच्या छत्तीसगडमधील मुख्यालयात 30 एप्रिलला मीडिया सेल प्रमुख सुशील आनंद शुक्ला यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. कार्यालयाचा दरवाजा बंद केला होता. एक मिनिट दरवाजा बंद होता. मी ओरडले, पण मदतीसाठी कुणीच आले नाही. मी तिथून कशीबशी बाहेर पडले. या प्रकाराबाबत मी सगळ्यांकडे तक्रार केली. पण कुणीच माझे ऐकले नाही, असे आरोप खेडा यांनी केले आहेत.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT