Lok Sabha Election 2024 Voting Live : मतदान करताच दिग्विजय सिंह यांची मोठी घोषणा; म्हणाले...

Digvijay Singh News : दिग्विजय सिंह यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता. त्यांनी मध्य प्रदेशात अनेक उमेदवारांचा प्रचार केला आहे.
Digvijay Singh
Digvijay SinghSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh News : देशातील 11 राज्यांमध्ये आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024 Voting Live) तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशात इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये लढत होत आहे. मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह हे दोघे जण किल्ला लढवत आहे.

आजही मध्य प्रदेशातील काही मतदारसंघांमध्ये मतदान होत असून दिग्विजय सिंह यांनीही मतदानाचा हक्क बजावला. पण मतदान केल्यानंतर त्यांनी निवडणुकीतील राजकारणाबाबत मोठी घोषणा केली आहे.

दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याची जाहीर केले. माझे वय आता 77 आहे. त्यामुळे ही माझी शेवटची निवडणूक असेल. आता युवकांना संधी मिळायला हवी, असे सिंह यांनी म्हणत सक्रीय राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत. (Latest Political News)

Digvijay Singh
Lok Sabha Election 2024 : अमेठी-रायबरेलीसाठी काँग्रेसची खास रणनीती; दोन माजी मुख्यमंत्र्यांवर मोठी जबाबदारी

देशात बंगाल आघाडीवर

देशात आतापर्यंत मतदानामध्ये पश्चिम बंगाल (West Bengal) आघाडीवर आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत 32 टक्क्यांहून अधिक मतदान राज्यात झाले आहे. राज्यात केवळ चार मतदारसंघांमध्ये मतदान होत असले तरी हिंसेच्या अनेक घटना समोर आल्या आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांकडे 180 हून अधिक तक्रारी दाखल जाल्या आहे. जांगीपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे (BJP) उमेदवार धनंजय घोष आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे. (Lok Sabha Voting Update)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुस्लिमांना आरक्षण मिळायला हवे

देशात मुस्लिम आरक्षणावरून (Muslim Reservation) वाद सुरू असताना आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुल्सिमांना पूर्ण आरक्षण मिळायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये आता पाच मतदारसंघात मतदान होत आहे. लोक आम्हाला मतदान करत आहेत. भाजप संविधान आणि लोकशाही संपवू इच्छित आहेत, असे यादव म्हणाले.

93 मतदारसंघात मतदान

देशातील आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा-नगर हवेली आणि दमन-दीव राज्यांतील 93 मतदारसंघात मतदान होत आहे. गुजरातमधील सर्व मतदारसंघात मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मतदानाचा हक्क बजावला.  

Digvijay Singh
Arvind Kejriwal News : नायब राज्यपालांचा केजरीवालांवर बॉम्ब; ईडी, सीबीआयनंतर आता 'टेरर फंडिंग'बाबत NIA चौकशीचा ससेमिरा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com