Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाकडून सातव्या टप्प्याचे नोटिफिकेशन जारी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Election Commission : निवडणूक आयोगाकडून सातव्या टप्प्यात 57 मतदारसंघांमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. या टप्प्यातील मतदान 1 जूनला होणार आहे.
Election Commission
Election CommissionSarkarnama

New Delhi News : देशात एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने सातव्या टप्प्याचे नोटीफिकेशन जारी केले आहे. या टप्प्यात सात राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशामध्ये मतदान होणार आहे. या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 14 मे ही अंतिम तारीख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही याच टप्प्यात मतदान होणार आहे.

देशातील 11 राज्यांतील 93 लोकसभा मतदारसंघांमध्ये मंगळवारी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) देशात सर्वाधिक मतदान झाले आहे. तुलनेने महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी कमी आहे. गुजरातमधील (Gujarat) सर्व जागांवर आज मतदान होत आहे. (Latest Political News)

Election Commission
Lok Sabha Election 2024 Voting Live : मतदान करताच दिग्विजय सिंह यांची मोठी घोषणा; म्हणाले...

निवडणूक आयोगाने (Election Commission) आज शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी नोटिफिकेशन जारी केले. या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 13 जागांवर मतदान होणार आहे. त्याखालोखाल पश्चि बंगाल (9), बिहार (8), ओडिशा (6), हिमाचल प्रदेश (4), झारखंड (3), चंदीगढ (1) या राज्यांमध्ये मतदान होणार आहे. या टप्प्याचे मतदान एक जूनला होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वाराणसीकडे लक्ष

पंतप्रधान मोदींचा वाराणसी हा मतदारसंघही सातव्या टप्प्यात आहे. त्यामुळे हा टप्पा भाजपसाठी महत्वाचा आहे. पंतप्रधान 13 तारखेला शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. यादिवशी ते मोठा रोड शो करणार आहेत.

याच टप्प्यात हिमाचल प्रदेशात मंडी मतदारसंघातही मतदान आहे. भाजपने यावेळी अभिनेत्री कंगना रनौतला उमेदवारी देत रंगत वाढवली आहे. काँग्रेसकडून विक्रमादित्य सिंह रिंगणात आहेत.  

सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया

नोटीफिकेशन – 7 मे

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 14 मे

अर्जांची छाननी – 15 मे

उमेदवारी मागे घेणे – 17 मे

मतदान – 1 जून

Election Commission
Lok Sabha Election 2024 : अमेठी-रायबरेलीसाठी काँग्रेसची खास रणनीती; दोन माजी मुख्यमंत्र्यांवर मोठी जबाबदारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com