Ambati Rayadu, CM Jagan Mohan Reddy Sarkarnama
देश

Ambati Rayadu in Politics : माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू राजकारणाच्या ‘पीच’वर; ‘या’ पक्षात केला प्रवेश

Rajanand More

Andhra Pradesh Politics : क्रिकेटचं मैदान गाजवलेला अंबाती रायडू आता राजकारणाच्या ‘पीच’वर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने गुरूवारी आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे प्रमुख, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत रायडूने राजकारणात पाऊल टाकले.

आगामी लोकसभा (Lok Sabha) व विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर रायडूने राजकारणात (Politics) प्रवेश केला आहे. त्यामुळे तो निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उमेदवारीबाबत रायडू किंवा वायएसआर काँग्रेसकडून (YSR Congress) अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रायडूच्या पक्षप्रवेशाबाबत पक्षाने सोशल मीडियातून माहिती दिली आहे. (Ambati Rayudu joined the YSR Congress Party)

अंबाती रायडूने काही महिन्यांपुर्वी निवृत्ती जाहीर केली आहे. रायडूने याच वर्षी जून महिन्यात जगनमोहन यांची पहिल्यांदा भेट घेतली होती. त्यानंतर रायडूच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. तो गुंटूर जिल्ह्यातील असून याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर कींग्ज संघाकडून अंतिम सामना खेळल्यानंतर रायडूने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर जगनमोहन यांच्या कामाचे तो सातत्याने कौतूक करत असतो. त्यामुळे त्याचा राजकारणातून प्रवेश निश्चित मानला जात होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT