Lok Sabha Election : ‘...तरुणांसाठी जागा सोडावी लागते’; निवडणुकीबाबत थरूर यांचं मोठं विधान

MP Shashi Tharoor : थरूर केरळमधील तिरुवअनंतपुरम मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.
Shashi Tharoor
Shashi Tharoor Sarkarnama
Published on
Updated on

Congress News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर यांनी लोकसभा निवडणूक लढण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आगामी निवडणूक आपली शेवटची निवडणूक असणार असल्याचा त्यांनी म्हटलं आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामुळे शशी थरूर यांच्या उमेदवारीवरून बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत.

थरूर (Shahsi Tharoor) हे केरळमधील (Kerala) तिरुवअनंतपुरम लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बोलतानाचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 2024 मध्ये होणारी निवडणूक आपली शेवटची निवडणूक असेल, असं त्यांनी या व्हिडिओत म्हटलं आहे. याविषयी आता त्यांनी खुलासा केला आहे.

Shashi Tharoor
Lok Sabha Security Breach : आरोपी आता घडाघडा बोलणार; दिल्ली पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल

‘एक वेळ अशी येते की जेव्हा युवकांना संधी देणे आवश्यक असते, असं मला वाटतं. पण राजकारणात असंही म्हटलं जातं की, कधीही नको म्हणू नका. मी जर निवडणूक लढवत असेन तर शेवटच्या निवडणुकीप्रमाणे पूर्ण ताकदीने लढवेन. मी जिंकलो तर तिरुवअनंतपुरम मधील लोकांसाठी माझी 20 वर्षांची सेवा होईल. त्यानंतर मी आनंदाने पद सोडू शकतो,‘ असं सूचक विधान थरूर यांनी केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2014 पासून मोदी लाटेत थरूर यांनी आपल्या मतदारसंघात मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यामुळे यावेळीही त्यांची उमेदवारी पक्की असल्याचे मानले जात आहे. पण त्यांनी केलेल्या वक्तत्यामुळे आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Shashi Tharoor
Revanth Reddy Vs KCR : मुख्यमंत्र्यांकडूनच केसीआर यांची पोलखोल; नव्याकोऱ्या 22 लँड क्रूझर गाड्या लपवल्या

दरम्यान, इंडिया आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. स्थानिक पातळीवर याबाबतचा निर्णय सोपविण्यात आल्याचे समजते. पण अजूनही इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये मतमतांतरे असल्याने, नेत्यांच्या नाराजीच्या बातम्या येत असल्याने संभ्रम वाढत चालला आहे.

Shashi Tharoor
Captain Vijaykanth : राजकारणातील ‘कॅप्टन’ला कोरोनाने हरवलं; विजयकांत यांचं निधन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com