MA Khan ANI
देश

राहुल गांधींवर गंभीर आरोप करत आणखी एका नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी

राहुल गांधी यांना ज्येष्ठ नेत्यांशी कसे वागावे हेही कळत नाही, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी राजीनामा देऊन दोन दिवस होत नाहीत, तोच आणखी एका नेत्याने काँग्रेस पक्षाला (Congress) रामराम केला आहे. विशेष म्हणजे राजीनामा देताना या नेत्यानेही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. आझाद यांनी मांडलेल्या मुद्यांचाच त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे. (Former MP from Telangana M. A. Khan's resignation from Congress party)

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील नेतेमंडळी ठराविक दिवसानंतर पक्षातून बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते आता जम्मू काश्मीरमध्ये स्वतःचा पक्ष स्थापन करणार आहेत. आझाद यांची घोषणा होऊन ४८ तास उलटण्यापूर्वीच तेलंगणमधील (Telangana) माजी खासदार एम. ए. खान या आणखी एका नेत्याने पक्षाला धक्का दिला आहे. राहुल गांधी यांच्या धोरणामुळे पक्षातील बुजूर्ग नेते सध्या बाहेर पडत आहेत, असा आरोपही खान यांनी केला आहे.

राहुल गांधी यांच्या धोरणामुळेच काँग्रेस पक्षाची सध्याची अवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षे पक्ष बांधणीचे काम केलेले ज्येष्ठ नेतेच काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. राहुल गांधी यांना ज्येष्ठ नेत्यांशी कसे वागावे हेही कळत नाही, असा गंभीर आरोपही खान यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, पूर्वी जनतेत पोहोचण्यामध्ये काँग्रेस पक्ष कमी पडत आहे. तसेच, देशाला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर आम्ही घेऊन जाऊ, असा विश्वास जनतेला देण्यात आम्ही कमी पडत असल्याची कबुलीही खान यांनी राजीनामा देताना दिली.

जी २३ गटातील नेत्यांनी पक्षाच्या भल्यासाठीच हायकमांडला पत्र लिहिले होते. मात्र, ते गोपीनय पत्र सार्वजनिक करण्यात आले. ते पत्राची दखल घेऊन त्या प्रमाणे पक्षसंघटने सुधारणा केल्या असत्या तर आज पक्षावर ही वेळच आली नसती. मी तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ काँग्रेस पक्षात काम केले आहे. मात्र, आता मला राजीनामा देऊन पक्षाच्या बाहेर पडावे लागत आहे, हे कशाचे द्योतक आहे, असा सवालही खान यांनी विचारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT