मी ज्यादिवशी बोलेन, त्यावेळी आठ दिवस हंगामा होईल : सावंतांनी विरोधकांना सुनावले

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा पुण्यातील घर ते बालाजी नगर भागातील कार्यालय आणि कार्यालय ते घर असा दौरा जाहीर झाला आहे. त्यावरून सावंत हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

पुणे : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. आधी विधानसभेत त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला, तर आता ट्रोल केले जात आहे. विरोधकांना कारणही तसेच मिळाले आहे. पण विरोधकांच्या ट्रोलबाबत मी काही बोलणार नाही. पण, ज्या दिवशी बोलेन त्यावेळी मात्र आठ दिवस हंगामा होईल, असा इशारा सावंत यांनी दिला आहे. (The day I speak, there will be chaos for eight days : Tanaji Sawant)

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा पुण्यातील घर ते बालाजी नगर भागातील कार्यालय आणि कार्यालय ते घर असा दौरा जाहीर झाला आहे. त्यावरून सावंत हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. राजकीय नेतेमंडळींकडून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात येत असून नेटकऱ्यांकडून त्यांना ट्रोल केले जात आहे. त्यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी विरोधकांना इशरा दिला आहे.

Tanaji Sawant
‘मला जेलमध्ये टाकण्याच्या तारखा दिल्या जात आहेत’

सावंत म्हणाले की, सध्या मला ज्या पद्धतीने ट्रोल केले जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. पण, ट्रोल करणाऱ्यांशी मला काही देणं घेणं नाही. मी सध्या जास्त काही बोलणार नाही. पण, ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी बोलेन तेव्हा मात्र आठ दिवस गदारोळ माजलेला असेल. मुळात मी शासकीय गाडी वापराच्या विरोधात आहे. पुण्यात काल माझा वेळ राखीव होता आणि मी शासकीय गाडीही मागितली नव्हती. काल मी माझ्या मतदारसंघातील आणि माझ्या कॉलेजचं काम करत होतो. पण, विरोधकांनी माहिती न घेताच माझ्यावर टीका केली. एक किलोमीटरचा दौरा, मी डीव्ही कार मागितली, असे आरोप करण्यात आले.

Tanaji Sawant
काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी...ते फुटणार की... : शहाजीबापूंच्या बॉम्बगोळ्याने खळबळ

वास्तविक माझ्याकडे स्वतःच्या मोटारी आहेत. मी प्रोटेक्शनही नेहमी टाळत आलेलो आहे. आपल्या संरक्षणाचा खर्च सरकारवर येऊ नये, अशी माझी इच्छा असते. सध्या तर जनतेला संरक्षणाची गरज आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून हे लोक मला ट्रोल करत आहेत, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

Tanaji Sawant
CEO आयुष प्रसादांचीच चौकशी करा : वाबळेवाडी पालकसभेचा ठराव शिंदे-फडणवीसांना देणार

आगामी गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, यासंदर्भात मी काल पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मी माझे काम करत राहणार आहे, त्यामुळे ट्रोल करणारे काय बोलतात, याकडे मी अजिबात लक्ष देणार नाही. मला वरिष्ठांनीही सांगितलं आहे की त्यांना काय करायचं ते करु द्या. त्यांना अजिबात प्रतिसाद देऊ नका. पण मी ज्यादिवशी बोलेन, त्यादिवशी मात्र गदारोळ माजलेला असेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com