Rahul Gandhi, Sonia Gandhi and Sunil Jakhar
Rahul Gandhi, Sonia Gandhi and Sunil Jakhar  Sarkarnama
देश

काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्यानं केला पक्षाला रामराम

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबसह (Punjab) इतर चार राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाला होता. पंजाबमधील सत्ता गेल्याने पक्षातील अंतर्गत वाद पेटला होता. माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्यावर टीकेचे झोड उठवणारे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल जाखड (Sunil Jakhar) यांच्यावर यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. यानंतर त्यांनी आता काँग्रेसलाच धक्का देत थेट पक्षाला रामराम केला आहे.

जाखड यांना नुकतीच पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. चन्नी यांच्यावर टीका केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर आज जाखड यांनी थेट पक्ष सोडल्याचीच घोषणा केली. गुडबाय, गुडलक काँग्रेस, असं म्हणत त्यांना पक्षाला रामराम केला. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पक्ष सोडल्याचं जाहीर केलं असून, पक्षातील जुन्या सहकाऱ्यांवरही सडकून टीका केली. काँग्रेस नेतृत्वाची बैठक उदयपूरमध्ये सुरू असतानाच जाखड यांनी पक्षाला धक्का दिला आहे. भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची चर्चा सुरू असताना जाखड यांच्या जाण्याने पक्षाला फटका बसण्याची चिन्हे आहेत.

जाखड यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे माजी मुख्यमंत्री चन्नी आणि काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांच्यावर टीका केली होती. बातम्यांचे फोटो ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्या बातमीत चन्नी यांना काँग्रेसची संपत्ती असल्याचे म्हटले आहे. यावरून जाखड यांनी म्हटलं होत की, संपत्ती, तुम्ही गंमत करत आहात का? देवाचे आभार, चन्नी यांना त्या पंजाबी महिलेने (अंबिका सोनी) काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केलं नाही. त्यांनी पहिल्यांदा चन्नी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी प्रस्तावित केलं होतं. चन्नी त्यांच्यासाठी संपत्ती असून शकतात, पण पक्षासाठी ओझं आहेत. काँग्रेस हायकमांड नव्हे तर त्यांच्या लालचीपणामुळे स्वत: चन्नी आणि पक्षाचं नुकसान केलं.

आपल्या ट्विटबाबत माध्यमांशी बोलताना जाखड यांनी नंतर खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, कुणावरही आरोप करणे हा माझा हेतू नाही. पण काल काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत हाय कमांडची ज्यापध्दतीने दिशाभूल करण्यात आली, त्यामुळे निराश झालो आहे. मागील 30 वर्षांपासून राज्यसभेत खासदार असलेल्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी चन्नी यांचं नाव सुचवलं होतं. पंजाबमधील लोकांना बदल हवा होता. पण ज्यांना पुढं करण्यात आलं ते त्यांच्याच हाताने अडकले. आजारापेक्षा उपचार भयानक होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT