राजीनामा देऊनही अडचणी संपेनात; माजी पंतप्रधानांचा पाय खोलात

देशात अस्थिरता निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान पदावरून पायउतार
Mahinda Rajapaksa Latest News
Mahinda Rajapaksa Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

कोलंबो : श्रीलंकेच्या (Sri Lanka) पंतप्रधानपदाचा (Prime Minister) महिंदा राजपक्ष (Mahinda Rajpaksha) यांनी राजीनामा दिला असून, यानंतर देशात सरकारविरोधी आंदोलनाचा आगडोंब उसळला आहे. यामुळे राजपक्ष कुटुंब नौदल तळावर लपून बसले आहे. यातच न्यायालयाने राजपक्ष यांच्यासह त्यांचा मुलगा आणि इतर 15 राजकीय सहकाऱ्यांना देश सोडण्यास मनाई केली होती. आता राजपक्ष यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून, त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. (Sri Laka Crisis News Updates)

शांततापूर्ण आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यांप्रकरणी एका वकिलाने राजपक्ष यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. राजपक्ष यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आंदोलकांवर हल्ला करण्याचा कट आखल्याप्रकरणी कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी ही याचिका कोलंबोतील न्यायदंडाधिकारी न्यायालयात केली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाला या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे राजपक्ष यांच्या अडतणीत वाढ झाली असून, त्यांना अटक होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

Mahinda Rajapaksa Latest News
सैन्याची परेड पडली महागात अन् लाखो जण झाले क्वारंटाईन

दरम्यान, सरकारविरोधी आंदोलकांवर बळाचा वापर करून हिंसाचार केल्याप्रकरणी न्यायालयाने राजपक्ष यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना नुकताच दणका दिला होता. राजपक्ष यांच्यासह 15 सहकाऱ्यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यासोबत या हिंसाचाराचा तपास करण्याचे आदेशही न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत. श्रीलंकेत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर हल्ले झाले होते. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी याला प्रत्युत्तर दिले. यातून हिंसाचार होऊन 9 जणांचा मृत्यू तर मोठ्या प्रमाणात मालमत्तेची जाळपोळ आणि नुकसान करण्यात आले होते. न्यायालयाच्या मनाई आदेशामुळे राजपक्ष, त्यांचा राजकारणी मुलगा अमल आणि इतर 15 सहकाऱ्यांना देश सोडता येणार नाही.

Mahinda Rajapaksa Latest News
उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला बळी अन् लाखो जण विलगीकरणात

महिंदा राजपक्ष आणि त्यांचे कुटुंबीय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत नौदलाच्या त्रिंकोमाली नौदलाच्या तळावर लपून बसले आहेत. हजारोच्या संख्येने आंदोलकांनी पंतप्रधान निवासस्थानाला घेराव घालत पेट्रोल बॉम्ब फेकले होते. तसेच, निवास्थानाबाहेरील गाड्याही पेटविल्या होत्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षारक्षकांना गोळीबार करावा लागला होता. त्यानतंर श्रीलंकेच्या सैनिकांनी महिंदा राजपक्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांना घराबाहेर काढून नौदलाच्या तळावर हलवले. हा तळ राजधानी कोलंबोपासून 270 किलोमीटर अंतरावर आहे. यानंतर आंदोलकही नौदलाच्या तळावर पोचले आहेत. त्यांनी या तळाला वेढा घातला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com