New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नेहमीच धक्कातंत्राचा वापरले जाते.कधी जिंकलेल्या राज्याचं मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवताना,निवडणुकांसाठी उमेदवार देताना,कधी पदाधिकारी नेमताना अशा विविध पातळ्यांवर मोदी-शाहांकडून नेहमीच धक्कातंत्र वापरले गेल्याचं दिसून आलं आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आता आपल्या टीममध्ये अनपेक्षित असा बदल घडवून आणला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर राहिलेल्या शक्तिकांत दास यांची कार्यक्षमता, अनुभव,परफेक्ट कार्यपध्दती,अर्थविषयावर असलेली मजबूत पकड हेरून त्यांना प्रधान सचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव एक नंबरचे सचिव म्हणून पी.के.मिश्रा हे सध्या कार्यरत आहे.तर दुसर्या क्रमांकाचे प्रधान सचिन म्हणून आता शक्तिकांत दास हे असणार आहे.
शक्तिकांत दास (Shaktikanta Das) दास हे तामिळनाडू केडरचे माजी आयएएस अधिकारी आहेत. दास 1980 बँचचे आयएएस अधिकारी आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या विविध पदांवर काम केलेलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी 2018 ते 2024 या दरम्यान त्यांनी काम केलेलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर असताना त्यांनी अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करत महत्वाची भूमिका बजावलेली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून शक्तिकांत दास यांनी तब्बल 6 वर्षे काम पाहिलं.ते गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यांत निवृत्त झाले होते. आता निवृत्तीनंतर त्यांना काही महिन्यांतच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते आता पीएम नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव करण्यात काम पाहणार आहेत. दास 1980 बँचचे आयएएस अधिकारी आहे.
केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने शक्तिकांत दास यांच्या नियुक्तीबाबतचा निर्णय घेतला असून त्याचा शनिवारी(ता.22) आदेशही काढले आहे.दास यांची नियुक्ती प्रधानमंत्री यांच्या कार्यकाळ असेपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत जे सर्वात आधी होईल, तोपर्यंत असणार अशी माहिती दिली आहे. तसेच ते प्रधान सचिव डॉ.पी.के. मिश्रा यांच्यासह प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहणार आहे.
शक्तिकांत दास यांनी आरबीआयच्या गव्हर्नर पदावर काम करण्याआधी वित्त, करआकारणी, यांसह अनेक महत्त्वाच्या विभागात काम केलं आहे. तसेच त्यांच्याकडे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांच्या जबाबदार्या निभावल्या आहेत. पण दास यांची आरबीआयचे नेतृत्व करताना कस लागला. कारण कोरोना काळात जागतिक स्तरावर आर्थिक परिस्थिती कोलमडलेली असताना त्यांनी भारताला या महामारीतून सुखरुप बाहेर काढले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.