Ravindra Dhangekar: पक्षप्रवेशाचा 'धंगेकर पॅटर्न'..? आधी 'स्टेटस'ची चर्चा अन् आता मुलाच्या बर्थ डेला उदय सामंतांची 'एन्ट्री'

Ravindra Dhangekar Will Join Shivsena : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये ऑपरेशन टायगर चर्चेत आहेत. या ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या सेनेमध्ये नाराज असलेल्या नेत्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेतून करण्यात येत आहे
Ravindra Dhangekar .jpg
Ravindra Dhangekar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर हे काँग्रेसला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. रवींद्र धंगेकर हे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल होतील असं बोललं जात आहे. या पार्श्वभूमी वर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी रवींद्र धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) मुलाचा वाढदिवस साजरा केला असल्याचं समोर आला आहे. याबाबतचे फोटो उदय सामंत यांनी ट्विट केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये ऑपरेशन टायगर चर्चेत आहेत. या ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या सेनेमध्ये नाराज असलेल्या नेत्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेतून करण्यात येत आहे. आगामी महापालिका निवडणुक पूर्वी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी हे मिशन टायगर राबवण्यात येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे कसब्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर रवींद्र धंगेकर यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केला असला तरी सातत्याने ते शिंदे यांच्या शिवसेनेत जातील अशा चर्चा रंगत आहेत.

Ravindra Dhangekar .jpg
Goa Politics : राजकारण पेटलं; 'CM सावंतांना गाडा' म्हणणाऱ्या नेत्याला पोलिसांनी उचललं; विरोधकांचा हुकुमशाही म्हणत थयथयाट

सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेने पुरत मर्यादित असलेले हे मिशन टायगर आता काँग्रेस आणि मनसेच्या नाराज नेत्यांपर्यंत पोहोचला आहे. मनसे आणि काँग्रेसच्या (Congress) नाराज नेत्यांना देखील आपल्या पक्षात घेण्यासाठी शिंदेंच्या सेनेतून प्रयत्न होत असल्याचं सांगितलं जात आहे.

याच पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत हे पुण्यामध्ये असताना रवींद्र धंगेकर यांनी त्यांची भेट घेतली असल्याचा समोर आला आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटी दरम्यानच रवींद्र धंगेकर यांच्या मुलाचा वाढदिवस देखील साजरा केल्याचे समोर आला आहे.उदय सामंत यांनी याबाबतचे फोटो ट्विट केले आहेत.

धंगेकर हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. नुकत्याच काँग्रेसकडून आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मतदारसंघानिहाय निरीक्षकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये देखील धंगेकरांना डावलण्यात आला आहे.

Ravindra Dhangekar .jpg
Suresh Dhas : आका... आका... म्हणत हादरून सोडणाऱ्या सुरेश धसांना मुंडे समर्थकांनी दोनदा दाखवले काळे झेंडे; म्हणाले, 'आष्टीत येतीलच की...' (VIDEO)

यानंतर धंगेकरानी भगवा परिधान केलेलं फोटो टाकत व्हाट्सअप स्टेटस ठेवलं होतं. यानंतर देखील धंगेकर हे लवकरच सेनेमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता उद्या सामंत यांनी धंगेकर यांच्या भेटीचे फोटो ट्विट केल्यामुळे धंगेकरांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरलाय का ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com