VHP demands on temple rights Sarkarnama
देश

Mahakumbh 2025 : हिंदूंची मंदिरं सरकारी नियंत्रणातून मुक्त करा; विश्व हिंदू परिषदेची मोठी मागणी

VHP demands on temple rights : देशभरातील हिंदूंच्या मंदिरांवरून सरकारी नियंत्रण पूर्णपणे काढून टाकावे, अशी आक्रमक मागणी विश्व हिंदू परिषदेने शुक्रवारी केली. प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या परिसरात विश्व हिंदू परिषदेची बैठक झाली.

सरकारनामा ब्युरो

Prayagraj News, 25 Jan : देशभरातील हिंदूंच्या मंदिरांवरून सरकारी नियंत्रण पूर्णपणे काढून टाकावे, अशी आक्रमक मागणी विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) शुक्रवारी केली. प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या परिसरात विश्व हिंदू परिषदेची बैठक झाली.

त्यात हिंदू समाजाच्या जन्मदरापासून मंदिरांपर्यंत विविध मुद्यांवर चर्चा झाली. 'आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील मोठ्या सभेनंतर आता मंदिरांवरील नियंत्रणाचा विषय चर्चेत आला आहे. देशातील सर्व मंदिरांवरील (Temple) सरकारी नियंत्रण हटवले गेले पाहिजे. मंदिरांवरील नियंत्रण प्रस्थापित करणारे कायदे रद्द करण्याची गरज आहे.

यापुढे मंदिरांचे व्यवस्थापन श्रद्धाळू भाविकांकडेच सोपवले जावे', अशी मागणी या परिषदेतून समोर आली. याशिवाय विश्व हिंदू परिषदेने वक्फ बोर्डावरही भाष्य केले. वफ्क बोर्डाच्या (Waqf Board) अमर्याद अधिकारांना पायबंद घालण्याची गरज आहे आणि यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या कायदेशीर प्रयत्नांना सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

1984 च्या धर्मसंसदेनंतर अयोध्या (Ayodhya), काशी व मथुरा या तीनही मंदिरांसाठी हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद व संघ परिवार संकल्पबद्ध आहे व भविष्यातही राहील, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT