Amit Shah And Chhagan Bhujbal : अमित शाह यांनी अजितदादांचं वाढवलं 'टेन्शन'; नाराज भुजबळांशी साधलेली जवळीक चर्चेत (पाहा VIDEO)

Nashik Malegaon BJP Union Minister Amit Shah DCM Ajit Pawar NCP Chhagan Bhujbal : भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह काल नाशिकच्या मालेगाव दौऱ्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना विशेष स्थान दिल्याने वेगळ्याच राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
Chhagan Bhujbal & Amit Shah
Chhagan Bhujbal & Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य तथा ज्येष्ठ नेते छगन भुजबळांची नाराजी सर्वश्रुत आहे. महायुती मंत्रिमंडळात डावलले गेल्याने ते पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादांपासून लांब आहेत.

अशातच ते नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं असतानाच, भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी त्यांना मालेगाव दौऱ्यात दिलेलं विशेष महत्त्व चर्चेत आलं आहे. अमित शाह यांनी नाराज छगन भुजबळांशी साधलेल्या जवळीकमुळे अजितदादांचं मात्र 'टेन्शन' वाढलं आहे.

महायुतीच्या (Mahayuti) मंत्रिमंडळात छगन भुजबळांना राष्ट्रवादीकडून स्थान मिळालं नाही. त्यामुळे छगन भुजबळ हे अजितदादांवर कमालीचे नाराज आहेत. ही नाराजी शिर्डीतील राष्ट्रवादीच्या नव-संकल्प शिबिरात देखील उमटली. छगन भुजबळांनी शिबिरात सहभागी होताना, 'मी कोणा व्यक्तीसाठी नाही, तर पक्षासाठी आलो आहे', असे सांगून टाकलं. काही वेळ शिबिरात हजेरी लावून ते मुंबईला रवाना झाले. भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह काल नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग दौऱ्यावर होते. तिथं त्यांनी छगन भुजबळ यांनी इतर मंत्र्यांपेक्षा विशेष महत्त्व दिलं.

Chhagan Bhujbal & Amit Shah
Balasaheb Thorat : शिंदे नाराज झाले की, शेतावर जातात, सरकार कसं चालणार? काँग्रेस नेत्याचा टोला

अजंग इथं सहकार परिषद होती. तिथं व्यासपीठावर अमित शाह (Amit Shah) यांच्या उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डाव्या बाजूला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी आसन व्यवस्था होती. परंतु शाह यांनी स्वतःहून भुजबळ यांना आपल्या शेजारी डाव्या बाजूला आसनावर बसवले. उपमुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण सुरू असताना शाह आणि भुजबळ यांच्यात व्यासपीठावरच चर्चेत गुंग होते. अमित शाह यांनी आपल्या भाषणात भुजबळ यांचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे वरिष्ठ पदाधिकारी, असा उल्लेख केला.

Chhagan Bhujbal & Amit Shah
Dinvishesh 25 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

अमित शाह यांनी छगन भुजबळ यांना दौऱ्यात दिलेल्या महत्त्वाची स्थानाची चर्चा आता रंगू लागली आहे. अमित शाह यांनी भुजबळांचा उल्लेख करताना राष्ट्रवादी पक्षाचे नाव डावलल्यानं त्याचा वेगवेगळा अर्थ काढला जाऊ लागला आहे. त्यामुळे छगन भुजबळ नजीकच्या काळात वेगळा आणि मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीकडून संधी मिळाली नाही. त्यानंतर नाराज झालेले छगन भुजबळ हे अजित पवारांविरोधात थेट आक्रमक झाले होते. 'जहां नहीं चैना वहां नहीं रहना', असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती. भुजबळ यांचे कार्यकर्ते आणि समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभर निदर्शने केली. छगन भुजबळ यांनी समता परिषदेचा मेळावा घेत राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर 'ओबीसीं'साठी दौरे करणार असल्याचे जाहीर केलं आहे. तसंच समता परिषदेनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकांचा धडका लावला आहे.

छगन भुजबळ यांनी पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादांना डावलत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. आता अमित शाह यांनी मालेगाव दौऱ्यात छगन भुजबळांना इतर मत्र्यांपेक्षा दिलेलं महत्त्वाचं स्थान, दोघांमध्ये रंगलेल्या गप्पांमुळे आगामी काळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगळ्याच राजकीय घडामोडी घडणार, असे संकेत, तर नाही ना, अशी देखील चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com