Gas rate in Hotel Bill during Iran USA War: इराण-अमेरिका अन् इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गॅस अन् तेलाचा तुटवडा भासायला लागला आहे. महाराष्ट्रात हॉटेल आणि रेस्तराँ चालकांचे हाल सुरु झाले आहेत, गॅस उपलब्ध नसल्यानं तसंच गॅसचे दर वाढल्यानं त्यांना सेवा देताना नाकीनऊ आले आहेत. त्यातच काही जणांनी खाद्यपदार्थ पुरवठा कायम ठेवला असला तरी त्यांचे दर वाढवले आहेत. अशातच चेन्नईतील एका रेस्तराँचं बिल व्हायरल झालं आहे, या बिहालमध्ये चक्क गॅसचा दरही लावण्यात आल्याचा दावा करण्यात येत असल्यानं खळबळ उडाली आहे.
चेन्नईच्या गिरास रेस्तराँ नावाच्या हॉटेलचं हे बिल आहे. प्रिंटेड स्वरुपाचं हे बिल असून यामध्ये ग्राहकानं इडली आणि मेदू वडा ऑर्डर केली होती. यामध्ये त्यानं एक प्लेड इडली आणि एक प्लेट वडा मागितला होता. खाल्याप्रमाणं हॉटेलनं याचं बिल ग्राहकाला देऊ केलं. पण हे बिल पाहिल्यानंतर ग्राहकाला चक्करच यायची बाकी होती. कारण कारण इडलीचे ३३.३३ रुपये तर मेदू वड्याचे ३३.३३ रुपये आणि त्याचबरोबर गॅसचा दर ९.५२ रुपये लावण्यात आले. त्याचबरोबर या सर्व एकूण बिलावर अडीच टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. या सर्वांचं एकूण बील हे ८० रुपये इतकी या बिलात लावण्यात आला आहे.
दरम्यान, हे बिल व्हायरल झाल्यानंतर सगळीकडं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण गॅससाठीचा वेगळा दर लावण्याची आपल्याकडं पद्धत नाही किंवा त्याला परवानगीच नाही. कारण कुठलाही खाद्य पदार्थ जो हॉटेल किंवा रेस्तराँमध्ये मिळतो त्या पदार्थांची किंमतच मुळात त्याला तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीसह बनवणाऱ्यांची मजुरी आणि फायदा यांचं गणित आखून केली जाते. त्यामुळं असं असताना गॅसची टंचाई आहे म्हणून आपदा मे अवसर या म्हणीप्रमाणं हॉटेल व्यावसायिकांनी आपला व्यवहार सुरु केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.