

LPG Vs DME : इराण-इस्रायल युद्धाची मोठी झळ सध्या जगभरातील अनेक देशांना बसताना दिसते आहे. विशेषतः पूर्व आशियातील देशांना यामध्ये भारतालाही तेल आणि गॅसचा पुरवठा कमी झाल्यानं मोठ्या संकटाला समोरं जावं लागतं आहे. भारतात घरगुती गॅस अर्थात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं लोकांच्या सिलिंडर रिफिल करण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. पण याच आपदा मे अवसर या म्हणीप्रमाणं पुण्यातील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाला अर्थात नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) मधील संशोधकांनी या एलीपीजी गॅसला नवा पर्याय सोधून काढला आहे. विशेष म्हणजे या नव्या पर्यायी गॅसच्या प्रकल्पालाही सुरुवात झाली आहे.
एनसीएलच्या संशोधकांनी शोधलेला हा पर्याय म्हणजे DME म्हणजेच डाय मिथाईल इथर नावाचा नवा गॅस शोधून काढला आहे. या गॅसचा वापर घरातील गॅसच्या शेगड्यांद्वारे स्वयंपाकासाठी वापर करता येऊ शकतो, असा दावाही करण्यात आला आहे. स्वंयपाक आणि वाहनांना इंधन म्हणून या गॅसचा वापर करता येऊ शकतो. विशेष म्हणजे हा गॅस एलपीजी गॅसपेक्षा जास्त शक्तीशाली आहे.
पुण्याजवळच्या पिरंगूट इथं या गॅसच्या उत्पादनाचा कारखाना देखील सुरु होतो आहे. जर मोठ्या प्रमाणावर या गॅसचं देशांतर्गतच उत्पादन सुरु झालं तर भारताला बाहेरच्या देशांवरील गॅससाठीचं अवलंबित्वही कमी होईल. गेल्या वर्षभरापासून एनसीएलच्या संशोधकांकडून यावर संशोधन सुरु होतं. पिरंगुट इथं या गॅसच्या उत्पादनाचा पायलट प्रकल्प सुरु झाला आहे. जर सरकारनं या गॅसच्या उत्पादनाला परवानगी दिली तर त्यामुळं नागरिकांपर्यंत एलपीजीसाठी नवा पर्याय उपलब्ध होईल.
डायमिथाईल इथर हे एलपीजीसारखं इंधन आहे. याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या एलपीजीसारख्या आहेत. घरातील सिलिंडरमध्ये त्यात ७ बारला एलपीजी भरला तर तो लिव्किफाय होतो. आपल्या घरातील सिलिंडरमध्ये अर्ध लिक्विड आणि अर्धा गॅस असतो. हा गॅस जसा वापरला जातो तसा यातील लिक्विडचंही रुपांतर गॅसमध्ये होत राहतं. याच प्रमाणे खरंतर एलपीजीला या गॅसद्वारे रिप्लेस करता येऊ शकतो. पण सध्याच्या परिस्थितीत याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे DME हा गॅस ८ टक्के LPG सोबत मिक्स करुन वापरणे किंवा २० टक्क्यांपर्यंत हा गॅस आपण एलपीजीमध्ये मिक्स करु शकतो, अशी माहिती या प्रकल्पावर काम करणाऱ्या एका संशोधकांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.