Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस खासदार व लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या पत्नीचे पाकिस्तान कनेक्शन असल्याचा दावा करत त्यांनी 10 सप्टेंबरला मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
सरमा यांनी सोशल मीडियातून काही प्रश्न केले आहेत. त्यांनी सकाळी केलेल्या एका पोस्टमध्ये गौरव गोगोई यांचे नाव न घेता तीन प्रश्न उपस्थित केले होते. तसेच असे अनेक प्रश्न असल्याचेही त्यांनी म्हटले होते. काँग्रेसच्या एका संसद सदस्यांना प्रश्न आहेत, असे म्हणत त्यांनी या खासदारांचे पाकिस्तानशी काय कनेक्शन आहे, याची विचारणा केली होती.
सरमा यांनी म्हटले होते की, तुम्ही 15 दिवसांसाठी पाकिस्तानला भेट दिली होती का?, उत्तर होय असेल तर त्याचे कारण काय होते, याचे स्पष्टीकरण द्याल का?, पाकिस्तानातील एनजीओकडून तुमच्या पत्नीला भारतात काम करण्याचे वेतन मिळते, हे खरे आहे का? हे खरं असेल तर भारतातील उपक्रमांसाठी पाकिस्तानातील संस्था वेतन काय देत आहे?, असे प्रश्न सरमा यांनी उपस्थित केले आहेत.
सरमा यांनी तिसऱ्या प्रश्नामध्ये गोगोई यांच्या पत्नी आणि मुलांच्या नागरिकत्वावरच प्रश्न उपस्थित केला आहे. ते भारतीय नागरीक आहेत का, किंवा त्यांच्याकडे इतर कोणत्या देशाचे नागरिकत्व आहेत का, असा प्रश्न सरमा यांनी केला आहे. सरमा यांच्या या पोस्टला गोगोई यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. मी आणि माझी पत्नी शत्रू राष्ट्राचे एजंट असल्याचा आरोप सिध्द न झाल्यास तुम्ही राजीनामा देणार का, असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
गोगोई यांनी आसाममधील कोळसा माफियांबाबतही प्रश्न केला आहे. त्यानंतर सरमा पुन्हा सरसावले आणि त्यांनी थेट आव्हानच दिले. मी, माझा मुलगा आणि मुलगी कधीही पाकिस्तानला गेलो नाही. माझी पत्नी आणि संपूर्ण कुटुबांतील कुणीही पाकिस्तनाची आर्थिक मदत किंवा वेतनाचा विचारही करू शकत नाहीत. माझे कुटुंब भारतीय आहे. माझ्या मुलांनी नागरिकत्व सोडलेले नाही, असा पलटवार सरमा यांनी केला आहे.
सरमा एवढ्यावरच थांबलेले नाहीत. आता उत्तर देण्याची वेळ तुमची आहे. पुढील काही दिवसांत काँग्रेसचे संबंधित संसद सदस्यांचे पाकिस्तानशी असलेल्या कनेक्शनबाबतची पुरेशी माहिती सार्वजनिक केली जाईल. 10 सप्टेंबर 2025 पर्यंत वाट पाहा, असे आव्हानच सरमा यांनी गोगोईंना दिले आहे. या आव्हानंतर गोगोई यांनी पुन्हा पहिल्या ट्विटमध्ये विचारलेले प्रश्नच विचारत सरमांचा दावा खोटा असल्याचे सूचित केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.