Gitanjali J Angmo Sarkarnama
देश

Sonam Wangchuk : 'पंतप्रधानांनी युनूस यांना भेटणं योग्य असेल तर...' सोनम वांगचुकच्या यांच्या पत्नी काय म्हणाल्या?

Geetanjali Wangchuk reaction on Sonam Wangchuk arrest : सोनम वांगचुक यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना अटक केल्यानंतर लद्दाखहून दूर जोधपूरच्या तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

Rashmi Mane

लद्दाखमध्ये अलीकडेच झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण रक्षक सोनम वांगचुक यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना अटक केल्यानंतर लद्दाखहून जोधपूरच्या तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांच्यावर हिंसा भडकावल्याचा आरोप असून राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (NSA) अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. त्यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप आहेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

सोनम वांगचुक यांची अटकेनंतर त्यांच्या पत्नी, गीतांजली यांनी त्यांच्या अधिकृत X (ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करून आपली भूमिका मांडली. त्यांनी प्रश्न विचारला आहे की, “जर देशाच्या पंतप्रधानांनी युनूस यांची भेट घेणे योग्य वाटते, तर educator and innovator म्हणून उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीने संवाद साधणे का अडचणी ठरते?”

त्यासोबतच काल गीतांजली अंगमो यांनी मीडिया समोर प्रतिक्रिया दिली की,“चार वर्षांपासूनच ही विच हंट सुरू होती.” त्याचबरोबर त्यांनी खुफिया ब्युरो (IB) आणि एफसीआरए (FCRA) चा संदर्भ देत आरोप केला की, या संस्थांचा वापर ब्लॅकमेलिंग आणि दबाव टाकण्यासाठी केला जात आहे.

गीतांजली यांनी सरकारकडे निष्पक्ष तपासणीची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, ही कारवाई लोकशाहीतील मूलभूत अधिकार दडपण्याचा प्रयत्न आहे. लद्दाखमध्ये सोनम यांच्या अटकेनंतर स्थिती तणावपूर्ण आहे, असे प्रशासनानेही नोंदवले आहे.

गीतांजली यांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांनी चार वर्षांपूर्वी लद्दाखला केंद्रशासित प्रदेशातून राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती आणि त्याचबरोबर सहावी अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी देखील केली होती. त्यांच्या या मागण्यांमुळे त्यांना लक्ष ठेवण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला.

SCROLL FOR NEXT