Ghulam Nabi Azad Sarkarnama
देश

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांना जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठा झटका!

Democratic Progressive Azad Party News : माजी मंत्र्यांने सोडली DPAP; जाणून घ्या, कोणत्या पक्षात करणार आहेत प्रवेश?

Mayur Ratnaparkhe

Jammu and Kashmir Assembly Elections : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून झाली आहे. याचबरोबर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनीही जोरदार तयारी केलेली आहे. असे असतानाच आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुलाम नबी आझाद यांना मोठा झटका बसला आहे.

कारण, त्यांच्या डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (DPAP) वरिष्ठ नेते आणि माजीमंत्री ताज मोहिउद्दीन यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. अशीही माहिती समोर येत आहे की, ताज मोहिउद्दीन घर वापसी करणार आहेत, म्हणजेच ते काँग्रेसमध्ये परत जाणार आहेत. काँग्रेसचे(Congress) जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष तारिक कर्रा हे दिल्लाहून आल्यानंतर मोहउद्दीन यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकतो.

जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यातील राजकारणातील हा पहिला मोठा बदल म्हणता येईल. डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीची साथ सोडलेल्या ताज मोहिउद्दीन यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश सोमवार किंवा मंगळवारी होवू शकतो, असं बोललं जात आहे.

जम्मू-काश्मीरमधील एकूण ९० विधानसभा मतदारसंघांसाठी तीन टप्प्यात मतदान होईल. पहिला टप्पा १८ सप्टेंबर, दुसरा टप्पा २५ सप्टेंबर आणि तिसऱ्या टप्प्याती मतदान १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर ४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल असणार आहे.

खरंतर गुलाम नबी आझाद(Ghulam Nabi Azad) यांनी जेव्हा काँग्रेस सोडली होती, तेव्हा ताज मोहिउद्दीन यांनीही त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. निवडणूक आयोगाच्या मते जम्मू-काश्मीर विधानसभांमध्ये यंदा तीन जागांची वाढ केली आहे. मागील वेळी जम्मू-काश्मीर विधानसभेत जागांची संख्या ८७ होती होती जी आता ९० झाली आहे. यामध्ये ७४ खुला प्रवर्ग, ९ अनुसूचित जमाती आणि सात अनुसूचित जाती यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक होत आहे. २०१९मध्ये जम्मू-काश्मीरपासून लडाखला वेगळं करण्यात आलं होतं. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी सारख्या पक्षांनी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT