Giorgia Meloni News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या विधानांमुळे सातत्याने चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादही निर्माण झाला आहे. त्यांच्या अशाच एका विधानामुळे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी थेट त्यांच्या भूमिकेवरच आक्षेप घेत फटकारले आहे. दोन्ही देशांमध्ये यामुळे वादाची ठिणगी पडली आहे.
काय म्हणाले ट्रम्प?
ट्रम्प यांनी एका इटालियन टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मेलोनी यांच्याविषयी केलेले विधान वादात अडकले आहेत. फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या जी ७ परिषदेत मेलोनी या आपल्यासोबत फोटो काढण्यासाठी भीक मागत होत्या, असे ट्रम्प म्हणाले आहेत. त्यांना माझ्यासोबत फोटो हवाच होता. मी फोटो काढणारच नव्हतो. पण त्यांची अवस्था पाहून मला दया आली, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
मेलोनी भडकल्या
मेलोनी यांनी ट्रम्प यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तातडीने सोशल मीडियात व्हिडीओ पोस्ट करत आपण या विधानावर आश्चर्यचकित झाल्याचे म्हटले आहे. त्यांचे विधान पूर्णपणे खोटे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मला समजत नाही की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या मित्रदेशांशी असे का वागतात. त्यांची ही पहिलीच वेळ नाही.
पश्चिमेकडील देशांशी अमेरिकेचे शत्रूत्व आहे. पण त्यांच्याबाबत ट्रम्प अशी ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत. हे निराशाजनक आहे. उलट त्या देशातील नेत्यांशी खूपच मवाळपणे वागत असल्याची नाराजी मेलोनी यांनी व्यक्त केली आहे. जी ७ परिषदेत मेलोनी आणि ट्रम्प यांच्यासह अन्य देशांच्या प्रमुखांमधील संवादाचे, फोटो सेशनमधील औपचारिक चर्चेचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.
कधीही भीक मागत नाही
मेलोनी यांनी शेवटी ट्रम्प यांना सूचक इशाराही दिला आहे. ट्रम्प यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, मी आणि माझा देश इटली कधीही कुणाकडे भीक मागत नाही, अशा शब्दांत मेलोनी यांनी ट्रम्प यांचा समाचार घेतला. दरम्यान. या वादानंतर इटलीच्या परराष्ट मंत्र्यांनी आपला दोन दिवसांचा अमेरिका दौरा तातडीने रद्द केला आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या विधानाचा निषेध केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.