Karnataka MLC Election : भाजपला हादरा देणारा निकाल, 4-5 आमदार फुटले; काँग्रेसच्या दमदार विजयामागची इनसाईड स्टोरी...

BJP Cross Voting, Congress Victory Karnataka : काँग्रेसच्या पाच उमेदवारांना मिळून १४० मतांचे गणित जुळविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मतदानानंतर काँग्रेसला सुखद धक्का बसला. निकालामध्ये काँग्रेसला एकूण १५१ मते मिळाली होती.
BJP vs Congress (AI Image)
BJP vs Congress (AI Image)Sarkarnama
Published on
Updated on

BJP Setback News : कर्नाटक विधानपरिषदेच्या सात जागांवरील निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला अन् भाजपला हादरा बसला. या निवडणुकीत काँग्रेसने पाच उमेदवार निवडून आणले. तर भाजपला दोन जागांवर विजय मिळाला. एनडीएतील मित्रपक्ष जेडीएसच्या उमेदवाराला पराभूत व्हावे लागले. काँग्रेसला मिळालेल्या विजयाला कर्नाटकसह देशाच्या राजकारणात महत्व प्राप्त झाले आहे.

विधानपरिषदेची निवडणूक असली तरी ही काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. सात जागांसाठी ही निवडणूक असली तरी काँग्रेसचे चार आमदार सहजपणे निवडून येतील, एवढी मते त्यांच्याकडे होती. तर एनडीएकडे दोन आमदार निवडून येतील एवढी मते होती. एका जागेचा तिढा होता. या जागेसाठी काँग्रेस आणि एनडीएनेही उमेदवार दिला. इथूनच खरी परीक्षा सुरू झाली.

राज्याच्या मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाल्यानंतरची डी. के. शिवकुमार यांची ही पहिलीच परीक्षा होती. काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळख मिळविलेल्या शिवकुमार यांच्या आग्रहानंतरही पाचवा उमेदवार रिंगणात उतरविण्यात आला. या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली तरी शिवकुमार यांना आणि सरकारलाही धक्का बसेल, याचीही जाणीव त्यांना असणार. पण त्यांनी धाडस करत एनडीएविरोधात उमेदवार दिला.

BJP vs Congress (AI Image)
Shiv Sena split news : 'ऑपरेशन टायगर'च्या वाटाघाटींमध्ये राजाभाऊंसमोर ओमराजेंचा 'मीटर' फुटला!

काँग्रेसच्या पाच उमेदवारांना मिळून १४० मतांचे गणित जुळविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मतदानानंतर काँग्रेसला सुखद धक्का बसला. निकालामध्ये काँग्रेसला एकूण १५१ मते मिळाली. जेडीएसच्या एकमेव उमेदवाराचा पराभव झाला. भाजप आणि जेडीएसची ११ मते फुटली. त्यामध्ये भाजपच्याही चार ते पाच आमदारांचा समावेश आहे. भाजपसाठी हाच मोठा हादरा मानला जात आहे. एनडीएतील आमदारांची अशी फाटाफूट पहिल्यांदाच समोर आली.

देशात राज्यसभा असो की विधानपरिषदेची निवडणूक अटीतटीच्या लढतीत भाजपचे निवडणूक मॅनेजमेंट विरोधकांवर सरस ठरल्याचे बहुतेकवेळा पाहायला मिळाले आहे. विरोधी पक्षातील आमदारांचे क्रॉस वोटिंग अनेक निवडणुकांमध्ये दिसले. गुरूवारीच झालेल्या झारखंडच्या राज्यसभेच्या निवडणुकीतही इंडिया आघाडीतील आमदार फुटल्याने भाजप समर्थिक अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. पण कर्नाटकात भाजपचे गणित पहिल्यांदाच चुकल्याचे स्पष्ट झाले आहे.

BJP vs Congress (AI Image)
Shiv Sena Anniversary : बंडखोर खासदारांपैकी फक्त दोघांनीच दिल्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा, पण कोणत्या शिवसेनेला?

भाजपचेही आमदार फुटू शकतात, हे एकप्रकारे शिवकुमार यांनी दाखवून दिल्याची चर्चा आहे. पक्षानेही याची गंभीरपणे दखल घेतली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडीयुरप्पा यांनी चार ते पाच आमदार फुटल्याचे मान्य करत राज्यातील आमदारांच्या फुटीचा रिपोर्ट पुढील एक-दोन दिवसांत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना देणार आहेत. त्यानंतर संबंधित आमदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल. पण शिवकुमार यांनी मात्र भाजपला झटका देत आगामी निवडणुकीआधी सूचक इशाराही दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com