New Delhi News: 2024च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा सामना करण्यासाठी, सर्व विरोधी पक्षांनी एकता दाखवली आणि मोठ्या उत्साहात इंडि आघाडीची स्थापना केली. पण आठ महिन्यांतच विरोधी पक्ष आघाडी तोडण्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत.
हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर याबद्दल चर्चा सुरू झाली होती. महाआघाडीतच काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात होते. आता, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये, महाआघाडीतील फूट स्पष्ट झाली आहे. दरम्यान, केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी विरोधकांच्या या 'इंडि' आघाडीबाबत मोठे विधान केले आहे.
फक्त भाजपच (BJP) नाही, तर एनडीएमधील सर्व पक्ष सुरुवातीपासूनच असे भाकित करताना दिसले की ही स्वार्थाची आघाडी आहे जी फार काळ टिकणार नाही. नितीशकुमार यांना याची कुठेतरी कल्पना आली होती. यामुळेच इंडि आघाडीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे नितीशकुमार यांचा पक्ष जेडीयू आघाडीपासून वेगळा झाला आणि पुन्हा एनडीएमध्ये सामील झाला. आता पुन्हा एकदा INDI मध्ये विभाजनाची चर्चा जोरात सुरू आहे.
INDI मधील फूट पडण्याच्या चर्चेवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी पाटणा येथे सांगितले की, "पंतप्रधान मोदींच्या भीतीमुळे INDI आघाडी स्थापन झाली. मात्र त्यांच्यापैकी कोणाकडेही पंतप्रधान मोदींविरुद्ध लढण्याची ताकद नाही. कारण पंतप्रधान मोदी देशासाठी काम करतात आणि तसाच विचारही करतात" मात्र हे लोक देशाबाहेर देशाबाबत अपशब्द वापरतात. जेव्हा स्वार्थी लोक स्वार्थासाठी एकमेकांशी भांडतात तेव्हा ते विभागले जाणे स्वाभाविक आहे."
यापूर्वी, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही INDI आघाडीतील सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली होती आणि म्हटले होते की, INDI आघाडीतील लोकांना फक्त त्यांच्या स्वार्थामध्ये रस आहे, कोणालाही आघाडीच्या हितांमध्ये रस नाही. फक्त 'आपलं राज्य, आपली व्यवस्था आणि आपली चिंता', हाच INDI आघाडीचा धर्म आहे. काँग्रेस पक्षाला स्वतःची चिंता आहे, राजदला स्वतःची चिंता आहे आणि 'आप'ला स्वतःची चिंता आहे, म्हणून भाजप आणि एनडीए या सर्वांना पराभूत करण्यासाठी एकत्र काम करतील.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.