Ajit Pawar on Manohar Parrikar sarkarnama
देश

Ajit Pawar : गोव्यात अजित पवारांच्या विधानाने खळबळ, भाजप प्रदेशाध्यक्षांनीच थेट घाव घातला; म्हणाले, 'त्यांचे राजकीय अज्ञान'

Ajit Pawar controversial statement on Manohar Parrikar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्यामुळे गोव्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी घेतला आहे.

Aslam Shanedivan

  1. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोहर पर्रिकरांविषयी केलेले वक्तव्य आता वादाचे कारण ठरले आहे.

  2. गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पवारांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे.

  3. या प्रकरणामुळे गोवा-महाराष्ट्र राजकारणात नव्या संघर्षाची सुरुवात झाली आहे.

Panjim News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या बाबत केलेले वक्तव्य आता वादाचे कारण ठरले आहे. त्यांनी कोण कोण पर्रीकर? असे विधान केल्याने त्याचे पडसाद शेजारी असणाऱ्या गोवा राज्यात उमटले आहेत. यावरून तेथे राजकारण चांगलेच तापलं असून गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत टीका केली आहे. पर्रीकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याची माहिती नसणे म्हणजे 'वेड पांघरुन पेडगावला जाणे असल्याचा टोला अजित पवार यांना लगावला आहे.

पुण्यात पाहणी दौऱ्यावर असताना अजित पवारांना एका महिलेने वाहतूक समस्येवरून थेट खडे बोल सुनावले होते. तसेच आता तुम्ही देखील गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासारखे फिरा असे म्हटले होते. यावर अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र कोण पर्रीकर? असे विधान केले होते.

आता याच त्यांच्या विधानावर गोव्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या असून टीका होताना दिसत आहे. गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पवारांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, 'मनोहर पर्रीकर हे असे व्यक्तिमत्व आहे, जे फक्त गोव्यातच नाही तर देश पातळीवर ओळखले जाते. त्यांच्या नावाने केवळ गोव्यातच काय तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ यासारख्या मोठ्या शहरांमध्येही अनेक संस्था आणि केंद्रे उभारण्यात आली आहेत.'

अशावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोण पर्रीकर म्हणतात. 'मनोहर पर्रीकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याची माहिती नसणे उपमुख्यमंत्र्याला नसणे म्हणजे 'वेड पांघरुन पेडगावला जाण्या' सारखे आहे. अजित पवारांचे असे म्हणणे म्हणजे त्यांचे राजकीय अज्ञान असल्याचेच दिसून येत असल्याचा घणाघातही नाईक यांनी केला.

दरम्यान, अजित पवार यांच्यासारख्या महाराष्ट्रातील एका वजनदार नेत्याने केलेल्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांमधील राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर काही राजकीय तज्ज्ञांच्या मते अजित पवार यांचे वक्तव्य हे नकळत झाले असावे, तर भाजपच्या एका प्रतिष्ठित नेत्याला जाणूनबुजून कमी लेखण्याचा प्रयत्न असल्याचा काहीजणांचा आरोप आहे.

FAQs :

प्र.1: अजित पवारांनी नक्की काय वक्तव्य केले?
उ.1: त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याबाबत विधान केले, जे वादग्रस्त ठरले.

प्र.2: या वक्तव्यावर गोव्यात काय प्रतिक्रिया उमटल्या?
उ.2: गोवा भाजपने तीव्र संताप व्यक्त केला आणि पवारांवर टीका केली.

प्र.3: गोवा भाजपच्या प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काय म्हटलं?
उ.3: त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आणि त्यावर कठोर प्रतिक्रिया दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT