प्रमोद यादव
Former Goa CM Ravi Naik Passes Away : गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषिमंत्री रवी सीताराम नाईक यांचं वयाच्या 79 व्या वर्षी मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. फोंडा येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पार्थिवावर आज (ता.15) ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता खडपाबांध येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नाईक यांच्या पुढाकारातून फोंडा नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम झाले. त्याचे उद्घाटन मंगळवारी झाले.
परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. सायंकाळनंतर त्यांची तब्येत अचानक खालावल्यानंतर त्यांना फोंड्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.
निधनाचे बातमी व्हायरल होताच रवींचे चाहते, हितचिंतक यांनी खड़पाबांध-फोंडा येथील निवासस्थानी मोठी गर्दी केली. 'धडाडीचा नेता, बहुजनांचा कैबारी हरपला', अशा उत्कट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रवी यांच्या पश्चात पुत्र नगरसेवक रितेश व रॉय, पत्नी पुष्पा, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.
दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माजी मुख्यमंत्री, कृषी मंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर दुख व्यक्त केलं. ते म्हणाले, 'मंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे राजकीय परिधात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वात गोव्यात प्रशासकीय स्थैर्य, ग्रामीण विकास आणि जनकल्याणाच्या अनेक योजना सुरू झाल्या. शांत स्वभाव, साधेपणा आणि प्रचंड जनसंपर्कामुळे ते सदैव आदरस्थानी राहिले. रवी नाईक यांचे गोवा राज्यासाठीचे योगदान अविस्मरणीय आहे.'
1976 साली फोंडा पालिकेवर नगरसेवक म्हणून निवडू. ते जवळपास पन्नास वर्षे राजकारणात सक्रिय राहिले.खासदार, विरोधी पक्ष नेता ते मुख्यमंत्रीपद अशी विविध पदे त्यांनी भूषविली. ते एका दिवसाचे सभापतीसुद्धा होते. 25 जानेवारी 1991 ला ते प्रथम मुख्यमंत्री तर 2 एप्रिल 1994 ला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.