Nagpur Crime : आत्महत्येपूर्वी विद्यार्थ्याची पंतप्रधानांच्या नावाने चिठ्ठी, मुली कायद्याचा गैरफायदा घेत असल्याचे केलं नमूद

Nagpur agriculture students addressed to PM Modi : राजस्थानच्या एका युवकाने नागपुरात शिक्षण घेत असतानाच आत्महत्या केली आहे. असे टोकाचे पाऊल उचलताना त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहल्याने आता खळबळ उडाली आहे.
PM Modi
PM Modisarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. नागपूरमधील कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने प्रेमात धोका मिळाल्यानंतर आत्महत्या केली.

  2. विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्र्यांना उद्देशून सुसाईड नोट लिहिली.

  3. पत्रात विद्यार्थ्याने “कायदा सर्वांसाठी समान असावा” अशी मागणी केली आणि मुलींकडून कायद्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला.

Nagpur News : प्रेमात धोका खाल्याने नागपुरमध्ये शिकत असलेल्या कृषी अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्यापूर्वी त्‍याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्या नावाने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात मुली कायद्याचा गैरफादा घेत असून आपल्या देशात कायदा सर्वांसाठी एक सारखाच असावा असे लिहून ठेवले आहे. माझ्यासोबत जिने चुकीचे केले तिला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणही त्याने आपल्या पत्रातून पंतप्रधान यांच्याकडे केली आहे.

ईश्वरलाल कंवरलाल चौधरी हा एकवीस वर्षाचा असून तो राजस्थानमधील बाडमेर येथील रहिवासी आहे. त्याच्या सुसाईड नोटवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीचे नाव गुंजन आहे. ईश्वरलाल विवाहित असून तो काचीपुरा चौकातील नवीन मुलांच्या वसतिगृहात राहात होता.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ईश्वरलालचे गुंजन नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून गुंजन त्याला पैशांसाठी ब्लॅकमेल करीत होती. लग्नासाठी दबाव टाकत होती. तसेच त्याला गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊ लागली होती. त्यामुळे ईश्वर तणावात होता. 1 ऑक्टोबरला ईश्वरने वसतिगृहात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

PM Modi
Nagpur Crime News : 4 महिने पोलिसांना चकवा देणारा नागपूर आयाडी घोटाळ्याचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात!

या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी ईश्वरच्या पत्नीचाही जबाब नोंदविला आहे. गुंजन ही ईश्वरकडे पैशांची मागणी करून लग्नासाठी दबाव टाकत होती. त्याचा मानसिक छळ करीत होती, अशी माहिती ईश्वरच्या पत्नीने पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलिसांनी गुंजनविरुद्ध ब्लॅकमेल व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ईश्वरने आत्महत्येपूर्वी लिहिलेली दोन पानी चिठ्ठी व त्याचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला.

ईश्वरने लिहलेल्या या चिठ्ठीत पंतप्रधान मोदींना याचना केली आहे. त्याने गुंजनने दिलेल्या धमक्यांचाही उल्लेख यात केला आहे. ज्यात गुंजने, मी मुलगी असल्याने न्यायपालिका माझ्या बाजूने आहे. तुझ्या मृत्यूने मला काहीच फरक पडत नाही नसल्याचे म्हटल्याचाही उल्लेख केला आहे.

तसेच मी ज्यांना मदत केली त्यांनी माझ्या आई-वडिलांना मदत करावी, माझी कमतरता भासू देऊ नका, असेही त्याने चिठ्ठीत मित्रांना उद्देशून म्हटले आहे. मी आत्महत्या केल्यानंतर माझे सॅड स्टेटस ठेऊ नका. त्याने काहीही होणार नाही. मी एकुलता एक मुलगा आहे. मी हरलो आहे. मी चुकीचे पाऊल उचलत आहे. याची शिक्षा माझ्या नातेवाइकांना भोगावी लागेल, असे ईश्वरने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

PM Modi
Nagpur Crime: आठ नवऱ्यांची फसवणूक करणारी 'लुटेरी दुल्हन' अखेर पोलिसांच्या जाळ्यात! विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून खतरनाक...

FAQs :

1. नागपूरमध्ये आत्महत्या करणारा विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमाचा होता?
→ तो कृषी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता.

2. विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी कोणाला पत्र लिहिले होते?
→ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे कृषी मंत्री यांना.

3. पत्रात विद्यार्थ्याने काय मागणी केली होती?
→ देशात कायदा सर्वांसाठी समान असावा अशी मागणी केली होती.

4. आत्महत्येचे कारण काय सांगितले जात आहे?
→ प्रेमात झालेला धोका आणि त्यातून निर्माण झालेला मानसिक ताण.

5. पोलिसांनी या घटनेबाबत काय कारवाई केली आहे?
→ पोलिस तपास सुरू असून सुसाईड नोटचा तपशील तपासला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com