Red Fort  Sarkarnama
देश

Red Fort  Kalash Thef : लाल किल्ल्यात मोठी चोरी! 1 कोटीच्या कलशावर चोरट्यांनी केला हात साफ

Delhi Police Red Fort : लाल किल्ला हा सर्वात सुरक्षित मानला जातो. येथे 24 तास सुरक्षाव्यवस्था तैनात असते मात्र येथून एक कोटीचा कलश चोरी झाला आहे.

Roshan More

Kalash Thef : देशाच्या राजधानी असलेल्या दिल्लीमधील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात चोरीची मोठी घटना समोर आली आहे. तब्बल एक कोटी रुपयाचा हिरे जडीत एक कोटी रुपयाचा कलश चोरीला गेला आहे. या हाय-प्रोफाईल चोरीची बातमी मिळताच पोलिस विभागात खळबळ उडाली असून तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे.

लाल किल्ला परिसरात जैन धर्मियांच्या वतीने धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये हा कलश ठेवण्यात आला होता. कलश चोरीचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

चोरी झालेला कलश तब्बल 760 ग्रॅम सोन्याचा बनवलेला होता आणि त्यात 150 ग्रॅम हिरे, माणिक आणि पन्ना असे मौल्यवान रत्न जडवलेले होते. त्याची किंमत साधारणपणे १ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. हा कलश व्यावसायिक सुधीर जैन दररोज पूजेसाठी आणत असत. मंगळवारी गर्दीच्या वेळी मंचावरून हा कलश गायब झाला.

चोरी कशी झाली?

लाल किल्ला हा देशातील सर्वात सुरक्षित स्थळांपैकी एक आहे. येथील सुरक्षेसाठी सीआयएसएफ (CISF) चे जवान तैनात असून सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. तरीदेखील या मोठ्या चोरीची घटना घडली. पोलिसांचा अंदाज आहे की चोरांची नजर याच कलशावर आधीपासून होती. मंगळवारी कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी स्वागताच्या गडबडीत चोरांनी कलशाची चोरी केली.

चोरटा सीसीटीव्ही कैद

दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. लाल किल्ला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी एका संशयिताची ओळख पटवली आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. जैन धर्मियांचा लाल किल्ल्याच्या १५ ऑगस्ट पार्कमध्ये हा धार्मिक कार्यक्रम सुरू आहे, जो ९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT