Neelam Gorhe : IPS अंजली कृष्णा अन् अजितदादा प्रकरणावर नीलम गोऱ्हे यांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाल्या; "सरकार योग्य कारवाई करेल पण..."

Ajit Pawar Viral Video : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आयपीएस अंजना कृष्णा सध्या राज्यभरामध्ये चांगल्याच चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत फोनवर त्यांच्या झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Ajit Pawar, Neelam Gorhe
Ajit Pawar, Neelam GorheSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 06 Sep : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आयपीएस अंजना कृष्णा सध्या राज्यभरामध्ये चांगल्याच चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत फोनवर त्यांच्या झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या प्रकरणावर खुद्द अजित पवार यांनी देखील स्पष्टीकरण दिलं असलं तरी याबाबतच्या चर्चा सुरूच आहेत. विरोधक देखील अजित पवारांवर कारवाईची मागणी करत आहेत. अशातच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, पंढरपूरच्या वारीप्रमाणे पुण्यातील अनंत चतुर्दशीची मिरवणूकही भव्य असते. गेल्या 25 वर्षांपासून त्या या मिरवणुकीत सहभागी होत आहेत. यंदाचा गणेशोत्सव विशेष आहे, कारण विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतरचा हा पहिला उत्सव आहे. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात आम्ही ज्या प्रार्थना केल्या, त्या प्रभुने पूर्ण केल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.

Ajit Pawar, Neelam Gorhe
India-US Relations : भारतावर 50 टक्के टॅरिफ लादणारे ट्रम्प नरमले; PM मोदींसोबतच्या मैत्रीचा उल्लेख करत म्हणाले, कधीकधी असे क्षण येतात...

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस महिला पोलीस अधिकाऱ्यासोबतच्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, “मी उपसभापती आहे, पण याबाबतचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे, जे मी वाचले.

आमचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, ही घटना घडली तेव्हा आम्ही कोणीही तिथे नव्हतो. त्यामुळे नक्की काय घडले, याची माहिती नाही. मात्र याबाबत जर अधिक काही माहिती समोर आली तर त्यावरती सरकार याबाबत योग्य ती कारवाई करेल.” असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Ajit Pawar, Neelam Gorhe
Pune Crime : पोलिसांना चकवा, एकीकडे रेकी आणि दुसरीकडेच हत्या? आंदेकरांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीच लिहिली होती स्क्रिप्ट!

तसंच यावेळी नाना पेठेतील हत्याकांड आणि टोळीयुद्धाबाबत बोलताना नीलम गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली. पुणे, मुळशी, मुंबईसारख्या शहरांमधील टोळीयुद्ध हे त्या शहरांपुरते मर्यादित नसते. त्यांचे धागेदोरे अनेक दशकांपर्यंत पसरलेले असतात. संशयित व्यक्ती कोणाच्या ना कोणाच्या संरक्षणाने बाहेर राहतात,” असे त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com