AI Image New Rules For Online Payments Sarkarnama
देश

Google Pay, PhonePe वापरताय? 1 एप्रिलपूर्वी हे नवे नियम जाणून घ्या, नाहीतर अडकू शकतात तुमचे व्यवहार!

Google pay new rules april 2026 india : 1 एप्रिलपासून UPI व्यवहारात मोठे बदल होणार आहेत. Google Pay आणि PhonePe वापरकर्त्यांनी हे नवे नियम जाणून घेणे गरजेचे आहे.

Rashmi Mane

Google Pay, PhonePe वापरताय? १ एप्रिलपासून डिजिटल व्यवहारांसाठी नवे नियम लागू होणार असून, प्रत्येकाने ते समजून घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा तुमचे व्यवहार अडकण्याची शक्यता आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑनलाइन फसवणूक कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंटसाठी 2FA म्हणजेच दोन टप्प्यांतील ओळख पडताळणी अनिवार्य केली आहे. याचा अर्थ आता कोणतेही ऑनलाइन पेमेंट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दोन वेगवेगळ्या पद्धतींनी तुमची ओळख सिद्ध करावी लागेल. यापूर्वी काही अॅप्सवर फक्त पिन किंवा एक क्लिकमध्ये व्यवहार पूर्ण होत होते, पण आता अतिरिक्त सुरक्षा आवश्यक असेल.

या नव्या नियमानुसार बँका, कार्ड नेटवर्क आणि फिनटेक कंपन्यांना ग्राहकांना ओळख पडताळणीचे अनेक पर्याय द्यावे लागतील. यामध्ये किमान एक पर्याय डायनॅमिक असणे बंधनकारक आहे, म्हणजे प्रत्येक व्यवहारासाठी वेगळा आणि तत्काळ तयार होणारा कोड वापरावा लागेल.

ग्राहकांना खालीलप्रमाणे पर्याय उपलब्ध असतील

पर्याय 1: OTP (डायनॅमिक) + पिन (स्टॅटिक)

पर्याय 2: बायोमेट्रिक (रिअल-टाइम) + डिव्हाइस लिंक

पर्याय 3: टोकन आधारित पडताळणी + पासवर्ड

यामुळे ग्राहकांना त्यांच्या सोयीप्रमाणे सुरक्षिततेची पद्धत निवडता येईल.

या बदलामुळे सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. ऑनलाइन फसवणूक, फिशिंग हल्ले आणि अनधिकृत व्यवहारांचे प्रमाण सध्या वाढले आहे. दोन स्तरांवरील सुरक्षा लागू झाल्याने हॅकर्सना तुमच्या खात्यात प्रवेश करणे अत्यंत कठीण होईल.

याशिवाय, जर बँक किंवा सेवा पुरवठादाराने नियमांचे पालन केले नाही आणि त्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित संस्थेवर असेल. त्यामुळे बँकांची जबाबदारीही वाढणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे हे नियम आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठीही लागू होणार आहेत. मात्र परदेशाशी संबंधित व्यवहारांसाठी हे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.

एकूणच, 1 एप्रिलपासून डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित होणार असले तरी, वापरकर्त्यांनीही सतर्क राहून नवीन नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT