Sanjay Raut : खरातबाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जाणरे 'ते' 40 आमदार कोण? संजय राऊतांच्या प्रश्नाने खळबळ, बड्या मंत्र्यांचे धाबे दणाणले!

which MLAs visited Ashok Kharat Baba Sanjay Raut question : खरात बाबा प्रकरणात 40 आमदारांचा संबंध असल्याचा संजय राऊतांचा आरोप. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

भोंदू बाबा अशोक खरात यांच्याशी संबंधित प्रकरण सध्या राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणामुळे अनेक राजकीय व्यक्तींची नावे समोर येत असून त्यात रुपाली चाकणकर यांचाही समावेश असल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. हा निर्णय त्यांनी काल रात्री घेतला असून त्यानंतर या प्रकरणाची चर्चा अधिकच तीव्र झाली आहे.

Sanjay Raut
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी 'गूड न्यूज'; फेब्रुवारीचा हफ्ता जमा व्हायला सुरुवात, आदिती तटकरेंची मोठी घोषणा!

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, स्वत: दीपक केसरकर म्हणतात, मीच का ? 40 आमदार तिथे जात होते. सत्ताधारी पक्षाचे नेते सांगत आहेत, मलाच टार्गेट करू नका. तिथे 40 आमदार, खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते, आता हे 40 आमदार कोण?, तिथे जाणारे मंत्री कोण?, हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे.

संजय राऊत यांनी पुढे असेही म्हटले की, खरात बाबासाठी विशेष विमानांची सोय करणारे सरकारमधले कोण लोकं होते?, हे त्यांनी सांगितलं पाहिजे, खरात बाबा दिल्लीत जाऊन काय करत होते?, कोणाला भेटत होते?, हे सुद्धा पोलीस तपासात निष्पन्न झालं असेल, तर ते समोर यायला पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली.

Sanjay Raut
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी होणार का? पोलिस आयुक्त काय म्हणाले?

खरात यांचा प्रभाव इतका मोठा होता की ते राज्यातील विविध स्तरांवर सक्रिय होते. त्यांच्या वावराबाबत बोलताना राऊत यांनी उपरोधिक टीका करत सांगितले की, जणू काही त्यांना सरकारी मान्यता मिळाल्यासारखे वातावरण होते. त्यांना पाठिंबा देणारे काही लोक आजही सत्तेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com