Fuel prices expected to fall after the central government announced a reduction in excise duty on petrol and diesel. sarkarnama
देश

Excise Duty : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार? सर्वसामान्यांना दिलासा!

Government Petrol Diesel Prices : इंधन टंचाईचा धोका असताना केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलास देत पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली.

Roshan More

Petrol Diesel Prices : अमेरिका-इराण युद्धामुळे देशात इंधन टंचाईचा धोका असताना केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत वाहनचालकांना दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने पेट्रोलवरील कर 13 रुपयांवरून 3 रुपयांवर आणलाय. तर डिझेलवरील कर पूर्णपणे रद्द केलाय.

युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. वाहनचालक पेट्रोलपंपावर रांगा लावत होते. मात्र, केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्याने त्याचा फायदा पेट्रोलियम कंपन्यांना होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

होमुर्झच्या समुद्रधुनीतून भारतीय जहाजांना प्रवासाची परवानगी इराणने दिलेली आहे. त्यामुळे देशात लवकरच इंधानाचा नवीन साठा उपलब्ध होणार आहे. दरम्यान, शेअर मार्केट उघडण्याआधीच सरकारने उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केल्याने मार्केट उसळी घेण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

महागाईवर नियंत्रण

युद्धामुळे महागाई वाढण्याचा धोका असताना इंधनाची किंमत कमी करून वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवणे, हा सरकारचा प्रमुख उद्देश असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सरकारच्या निर्णयाने मालवाहतुकीचा खर्च कमी होऊन सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT