Devendra Fadnavis on fuel crisis : राज्यात पेट्रोल-डिझेलचा खरंच तुटवडा? फडणवीसांनी एका वाक्यात सगळंच स्पष्ट केलं!

fuel shortage rumors Maharashtra truth : राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा आहे का? फडणवीसांनी एका वाक्यात स्पष्ट करत अफवांना पूर्णविराम दिला.
Devendra Fadnavis on fuel crisis
Devendra Fadnavis on fuel crisisSarkarnama
Published on
Updated on

राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या अफवा सध्या मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शांत राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, राज्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही आणि पुरेसा साठा उपलब्ध आहे.

फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने वारंवार खात्री दिली आहे की पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा आहे. तरीही काही शहरांमध्ये नागरिक अनावश्यकपणे पेट्रोल पंपांवर रांगा लावत आहेत आणि गरजेपेक्षा जास्त इंधन भरत आहेत. अशा प्रकारच्या वर्तनामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होतो आणि मागणी-पुरवठा व्यवस्थेवर ताण येतो. त्यामुळे लोकांनी घाबरून इंधन साठवण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis on fuel crisis
PF withdrawal : नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! EPFO आणतेय 'व्हर्जन 3.0'; जाणून घ्या काय आहे नवीन प्लॅन?

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सध्या राज्याकडे महिनाभरासाठी पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाने पंपावर जाऊन इंधन भरण्याची आवश्यकता नाही. तसेच, पेट्रोल पंपांवर काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यासोबतच खतांच्या साठ्याबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. केंद्र सरकारकडून खतांचाही पुरेसा साठा असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी खतांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. गेल्या 3 दिवसांत डीएपी खताच्या वापरात तब्बल 70% वाढ झाली आहे, जी घाबरून खरेदी केल्याचे लक्षण आहे.

Devendra Fadnavis on fuel crisis
Government action against farmer : शेतरस्ता अडवणाऱ्यांची खैर नाही! 'हे' महत्त्वाचं कार्ड होणार ब्लॉक तर सरकारी योजनांनही मुकावं लागणार! राज्य सरकारचा मोठा दणका!

फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देताना सांगितले की, आवश्यक त्या प्रमाणात खत उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे कोणीही साठेबाजी करू नये किंवा अनावश्यक खरेदी करू नये. जे पुरवठादार साठेबाजी करून शेतकऱ्यांना अडचणीत आणतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com