LPG supply India : देशभरात सिलिंडरसाठी रांगा, संसदेत राहुल गांधींनी टाकली काडी; केंद्र सरकारकडून एक घाव दोन तुकडे...

lpg cylinder shortage india : काळाबाजार रोखण्यासाठी व्यावसायिक सिलिंडरची विक्री नियंत्रित करण्यात आली आहे. त्याचा उद्देश दंडात्मक नव्हे तर पारदर्शकता आहे, असे पुरी यांनी स्पष्ट केले.
Rahul Gandhi parliament lpg issue
Rahul Gandhi parliament lpg issueSarkarnama
Published on
Updated on

Parliament fuel debate : देशभरात गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे ठिकठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसत आहे. त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. काही हॉटेल्स बंद करण्यात आल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. त्याचे पडसाद आज संसदेतही उमटले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज हा मुद्दा लोकसभेत उचलून धरण्यात आला.

राहुल गांधी यांनी देशभरात गॅसची टंचाई असल्याचे सांगतानाही भारतावर भविष्यात मोठे संकट ओढावू शकते, अशी भीतीही व्यक्त केली. त्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करता देशात पेट्रोल, डिझेलसह गॅसचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही पुरी यांनी केले.

पुरी म्हणाले, देशात पेट्रोल आणि डिझेल पुरेसे उपलब्ध आहे. सीएनजीचा पुरवठा शंभर टक्के सुरू आहे. जगात अनिश्चितता असली तरी भारताकडे पुरेसा साठा आहे. एलपीजीचे उत्पादन २८ टक्क्यांनी वाढले आहे. एलएनजीची जहाजे भारतात येत आहेत. भारताने आखातातील देशांवरील आपले अवलंबत्व कमी करून आता कॅनडा, अमेरिका, नॉर्वे आणि ऑस्ट्रेलिया या देशांकडूनही इंधन खरेदी केले जात आहे.

Rahul Gandhi parliament lpg issue
Amit Shah Vs Rahul Gandhi : समोर बसलेल्या राहुल गांधींवर शहांचे थेट वार; पण काँग्रेसच्या बड्या नेत्यानं हात वर करून का वाजविल्या टाळ्या?

काळाबाजार रोखण्यासाठी व्यावसायिक सिलिंडरची विक्री नियंत्रित करण्यात आली आहे. त्याचा उद्देश दंडात्मक नव्हे तर पारदर्शकता आहे. देशात गॅस उत्पादन पुरेसे असून वितरण व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली असल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले. कच्च्या तेलाच्या आयातीचे स्त्रोत २७ वरून वाढवून ४० देशांपर्यंत नेण्यात आले आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि एटीएफचा पुरवठा अडथळ्यांशिवाय सुनिश्चित कऱण्यात आल्याचेही पुरी म्हणाले.

Rahul Gandhi parliament lpg issue
OBC Creamy Layer : ओबीसी ‘क्रिमीलेअर’बाबत महत्वाची बातमी; केवळ पालकांचे वेतन निकष नाही, सुप्रीम कोर्टाचा सरकारला झटका

इतिहासात पहिल्यांदाच सामुद्रधुनी बंद होण्याच्या स्थितीचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यावर भारत यशस्वीपणे मात करत आहे. शेजारील देशांमध्ये इंधन संकटामुळे शाळा बंद कराव्या लागल्या. भारतामध्ये मात्र शाळा, हॉस्पिटल्सला प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारने या जागतिक संकटातही भारतीय अर्थव्यवस्था आणि जनतेला मोठा दिलासा दिल्याचे पुरी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com